IMPIMP

Menstrual Ayurvedic Treatment | मासिक पाळीच्या वेदनांमधून सुटका मिळवण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक उपाय

by nagesh
Menstrual Ayurvedic Treatment | ayurvedic treatment to get relief from menstrual pain

सरकारसत्ता ऑनलाइन – Menstrual Ayurvedic Treatment | मासिक पाळी (Menstrual Period) दरम्यान पोट, ओटीपोट आणि कंबरदुखीच्या त्रासाचा सामना प्रत्येक महिलेला करावा लागतो आहे. पीरियड्समध्ये प्रत्येक महिला कित्येक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यामुळे त्रस्त असते. परंतु, यापैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे ओटीपोटामध्ये असह्य अशा वेदना होणे. या वेदना महिलेला त्रस्त करत असतात (Women Health). त्याचबरोबर अनेक स्त्रियांना काही त्रास देखील होत नाही. तर, मासिक पाळीत होणारा शारीरिक त्रास थांबवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आयुर्वेदिकतज्ज्ञाकडून काही उपाय (Menstrual Ayurvedic Treatment) सुचविले आहेत. याबाबत जाणून घ्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय आहेत उपाय ? (What Are The Solutions Of Menstrual Pain)

आपल्या शरीराचे वेळापत्रक पाळा. रोज सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयानंतर लगेच उठण्याची सवय लावा. सूर्योदयानंतर नाश्ता करा अन् सूर्यास्तानंतर तासाभराने संध्याकाळचे भोजन करा. आपल्या निद्रा, जागृती, भोजनाच्या वेळा पाळा. त्याची शरीराला सवय झाल्याने विविध हार्मोनचे संतुलन राहते. (Menstrual Ayurvedic Treatment)

 

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी सर्वप्रथम चहा, कॉफी पिऊ नका. त्यातील कॅफेनने दुष्परिणाम होतात. त्याऐवजी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला उत्साही ठेवण्यासाठी 5 भिजवलेले मनुके, चार भिजवलेले बदाम, दोन भिजवलेले अक्रोड आणि एक भिजवलेला खजूर किंवा अंजिर खावेत. ध्यानधारणा, प्राणायाम आणि योगासने नियमितपणे करावीत. त्यामुळे दीर्घकालीन फायदे होतात. यामुळे ओटीपोटातील भागात चांगले रक्ताभिसरण होते. ज्यामुळे मासिक पाळीच्या वेळी गर्भाशयाचे स्नायू व्यवस्थितरीत्या आकुंचन पावतात.

 

अनुलोम-विलोम, भ्रामरी या प्राणायामांसह वज्रासन, बलासन, भद्रासन आणि शवासन यासारख्या योगासनांमुळे मासिक पाळीच्या काळात शरीर तणावमुक्त होण्यास मदत होते. त्यामुळे कार्यक्षमता वाढते (Menstrual Period Pain).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जिरे-धने-बडीशेप युक्त आयुर्वेदिक चहा, ओव्याचा, पुदिन्याचा चहा मासिक पाळीच्या त्रासात गुणकारी ठरतो. यापैकी एखादा पसंतीच्या चवीचा चहा घ्यावा. तसेच या काळात पुरेसे पाणी पीत राहावे. त्यामुळे पेटके, सूज आदी त्रास दूर राहतात.

 

वाळय़ाचे सुगंधी चांगल्या क्षारांनी युक्त पाणी प्या. पुदिन्याचे पाणी भरपूर प्रमाणात तयार करून दिवसभर ते गरजेनुसार पीत राहावे.
त्यामुळे मासिक पाळीतच नाही तर एकूण आरोग्यही चांगले राहते (Treatment For Menstrual Period Pain).

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Menstrual Ayurvedic Treatment | ayurvedic treatment to get relief from menstrual pain

 

हे देखील वाचा :

BJP MLA Ganesh Naik | भाजप आमदार गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक ? जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | बिबवेवाडीमधील ‘सराईत’ ओंकार उर्फ छोट्या लोखंडे व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’ ! पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 76 वी MCOCA कारवाई

Devendra Fadnavis | समरसतेच्या आधारावर पक्ष उभा करण्याचे आणि सर्वसमावेशकता आणण्याचे काम भाजपने केले – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts