IMPIMP

Pune Crime | बिबवेवाडीमधील ‘सराईत’ ओंकार उर्फ छोट्या लोखंडे व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’ ! पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 76 वी MCOCA कारवाई

by nagesh
Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Guptas 92nd MCOCA action till date against Criminals Nilesh Ghaiwal gang member and gang leader Rohit Akhade and his gang booked under mokka

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरातील गुन्हेगारांवर (Pune Criminals) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्याकडून गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Act) Mokka Action करण्यात येत आहे. पुण्यातील (Pune Crime) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth police station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी ओंकार उर्फ छोट्या सुनील लोखंडे (Omkar alias Chhotya Sunil Lokhande) याच्यासह त्याचे साथीदार दशरथ भिमा जोगदंड (Dashrath Bhima Jogdand), प्रदिप धर्मा देवकुळे (Pradip Dharma Devkule), कान्हा उर्फ रोहित भिमा जोगदंड (Kanha alias Rohit Bhima Jogdand) यांच्यासह दोन विधिसंघर्षित बालक यांच्यावर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 76 आणि चालु वर्षात 13 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

टोळी प्रमुख ओंकार उर्फ छोट्या सुनील लोखंडे (वय-25 रा. पद्मजा पार्ख जवळ, बिबवेवाडी), दशरथ भिमा जोगदंड (वय-25 रा. एसआरए बिल्डींग, ए विंग बिबवेवाडी), प्रदीप धर्मा देवकुळे (वय-26 रा. लेकटाऊन शेजारी, बिबवेवाडी), कान्हा उर्फ रोहित भिमा जोगदंड (वय-24 रा. बिबवेवाडी) यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

 

आरोपी ओंकार उर्फ छोट्या लोखंडे आणि त्याच्या 5 साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder), अपहरण (Kidnapping Case), जबरी दुखापत करुन दरोडा (Robbery Case), दंगा, गंभीर दुखापत, कट करणे तसेच लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करणे, मारामारी अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.आरोपींनी टोळीची दहशत व वर्चस्व राखण्यासाठी 2009 पासून गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. आरोपींनी टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने दरोडा, विनापरवाना हत्यार बाळगणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे वेळोवेळी केले आहेत.

आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार Maharashtra Control of Organised Crime Act (MCOCA) कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी (ACP Yashwant Gawri) करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आयुक्तांची 76 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 76 तर चालु वर्षात 13 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे
(Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील,
सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर,
पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणीक (Police Inspector Vijay Puranik),
सर्व्हेलन्स पथकातील पोलीस उपनिरीक्षक गौरव देव (PSI Gaurav Dev),
पोलीस अंमलदार चंद्रकांत माने, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Pune Crime | MCOCA Act Mokka Action Pune Criminals Omkar alias Chhotya Lokhande and his 5 accomplices in Bibwewadi ! 76th MCOCA action of Pune Police Commissioner IPS Amitabh Gupta

 

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | समरसतेच्या आधारावर पक्ष उभा करण्याचे आणि सर्वसमावेशकता आणण्याचे काम भाजपने केले – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Corona Restrictions | महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध आणि मास्क सक्ती ?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

Atal Pension Yojana (APY) | मोदी सरकार दरमहिना तुमच्या खात्यात ट्रान्सफर करेल 5000 रुपये; लवकर जाणून घ्या स्कीम ?

 

Related Posts