IMPIMP

Mera Ration App | ‘माझे रेशन’ अ‍ॅपच्या मदतीने Ration Card संबंधी सर्व समस्या होतील दूर, कार्डधारकांना मिळतील या सुविधा

by nagesh
Mera Ration App | how change ration shop apply mera ration app ration card

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वन नेशन वन रेशन कार्ड (ONORC) अंतर्गत मोदी सरकारने माझे रेशन मोबाईल अ‍ॅप (Mera Ration App) लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने रेशन कार्डसंबंधी बहुतांश कामे ऑनलाइन मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने करता येऊ शकतात. रेशनकार्ड धारकांना PDS च्या मदतीने धान्य मिळते. मात्र, जेव्हा ते दुसर्‍या राज्यात जातात तेव्हा त्यांना थोडा त्रास होतो. अशावेळी कोणत्याही प्रकारची समस्या दूर करण्याच्या हेतूने Mera Ration App लाँच करण्यात आले होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

माझे रेशन अ‍ॅपच्या मदतीने रेशन कार्डसाठी रजिस्ट्रेशन करता येऊ शकते. याशिवाय रेशन कार्ड डाऊनलोड केले जाऊ शकते. तुमचे रेशन कार्ड आधार कार्डसोबत लिंक आहे किंवा नाही याची तपासणी सुद्धा करता येऊ शकते. सोबतच लिंक सुद्धा करता येऊ शकते. (Mera Ration App)

 

याशिवाय तुमच्या रेशन कार्डवर आतापर्यंत किती वितरण करण्यात आले आहे आणि तुमच्या घराजवळ कुठेकुठे रेशन डिलरचे दुकान आहे, याची सुद्धा चौकशी करू शकता. जर तुम्हाला रेशन डिलर बदलायचा असेल तर ही सुविधा सुद्धा या मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपवर 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये या तमाम सुविधा उपलब्ध आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

रेशन कार्डसंबंधी अनेक सुविधा उपलब्ध
जर तुम्ही एका राज्यातून दुसर्‍या राज्यात राहण्यासाठी जात असाल तर रजिस्ट्रेशनच्या पर्यायावर जा. येथे मायग्रेशनची सुविधा दिलेली आहे. नो युअर इनटायटलमेंट पर्यायाच्या मदतीने मिळत असलेल्या सुविधेबाबत माहिती मिळवू शकता.

 

रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबरमुळे या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. येथे तुम्हाला समजेल की रेशन कार्डला कोण-कोणती कमोडिटी मिळत आहे.

माझे रेशन अ‍ॅप खुप उपयोगी
माझे रेशन मोबाईल अ‍ॅप भारत सरकारने 12 मार्च, 2021 ला लाँच केले होते.
एनएफएसएच्या लाभार्थ्यांना, प्रामुख्याने प्रवाशांना रेशन कार्ड पोर्टेबिलिटीचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी ओएनओआरसी योजनेंतर्गत हे अ‍ॅपल लाँच करण्यात आले होते.
हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेसह 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

हे आहेत Mera Ration अ‍ॅपचे फायदे

– योग्य मूल्याच्या दुकानाचा शोध घेणे.

धान्य पात्रतेची तपासणी करा.

ट्रांजक्शन जाणून घ्या.

आधार सीडिंग स्टेटस पहा.

प्रवासी मायग्रेशन डिटेल्स अ‍ॅपच्या माध्यमातून रजिस्टर करू शकतात.

सूचना किंवा प्रतिक्रिया देण्याचा पर्याय.

 

आधार नंबरवरून करा लॉगिन
लाभार्थी आधार किंवा रेशन कार्डनंबरद्वारे मेरा रेशन मोबाईल अ‍ॅपमध्ये लॉगिन करूशकतात. सरकार 5.4 लाख रेशन दुकानांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला प्रति महिना 5 किलोग्रॅम सबसिडीचे रेशन पुरवते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

Web Title :- Mera Ration App | mera ration app solution of all ration card problems under one nation one ration card plan

 

हे देखील वाचा :

Palghar Crime | विवाहितेने अनैतिक संबंध तोडले; शेजाऱ्याने तिच्या चिमुकल्याला सोबत केलं ‘हे’ कृत्य

Omicron Covid Variant | महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं

Pune Crime | पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार ! ‘YouTube’ पाहून इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यानं बनावट पेमेंट अ‍ॅपद्वारे 25 सराफांना घातला गंडा

 

Related Posts