IMPIMP

MHADA | म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज

by nagesh
Mhada Lottery 2023 | important dates apply process pune mhada lottery 2023 news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन MHADA | पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ (MHADA) अंतर्गत म्हाडाच्या विविध योजनेतील घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आज (मंगळवार) पासून सुरु होतेय. आजपासून तुम्हाला म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. तर, ऑनलाईन अर्ज नोंदणीचा प्रारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज (मंगळवारी) करण्यात येत आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

म्हाडाच्या (MHADA) पुणे मंडळामार्फत विविध योजनेतील 4 हजार 222 नवीन घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते 29 ऑक्टोबर रोजी होणारा कार्यक्रम काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आला होता. या पार्श्वभुमीवर आता मुंबई येथील मंत्रालयातील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दालनात आज दुपारी 2.45 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil), म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर (Anil Diggikar), प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर (Milind Mhaskar) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, म्हाडाच्या विविध योजनतील दोन हजार 823 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 1
हजार 399 सदनिका अशा एकूण 4 हजार 222 नवीन सदनिकांच्या सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणीचे अर्ज सुरू होत आहे.

 

Web Title: MHADA | online application registration for lottery of mhada from today pune news

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | मलिकांचा आणखी एक ट्वीट ‘बाॅम्ब’ ! केपी गोसावीचे WhatsApp चॅट्स समोर, वानखेडेंवरही आरोप

Pune Crime | लॉकडाऊनमध्ये कंपनीत राहतो असे सांगून दुसर्‍या महिलेबरोबर अनैतिक ‘संबंध’

EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांना सुद्धा मिळते पेन्शन, EPFO ने सांगितले त्यांना केव्हापर्यंत मिळत राहील आर्थिक मदत?

 

Related Posts