IMPIMP

Pune Crime | लॉकडाऊनमध्ये कंपनीत राहतो असे सांगून दुसर्‍या महिलेबरोबर अनैतिक ‘संबंध’

by nagesh
Pune Crime | bottle liquor smashed head stopped drinking alcohol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | लॉकडाऊनच्या काळात अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. मात्र, या लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन एका नवरोबाने कामाच्या ठिकाणी राहत असल्याचे सांगून दुसर्‍या महिलेबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी रामवाडी येथील एका ३७ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी पती अभिजित जाधव याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित जाधव हा त्याच्या पत्नीला किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन शारीरीक छळ करीत होता.
फिर्यादीच्या पतीने लॉकडाऊनच्या काळात घरी न येता कामाचे ठिकाणी राहत असल्याचे सांगितले.
त्या कालावधीत त्याने एका महिलेसोबत अनैतिक संबंध (immoral relationship) ठेवले.
या महिलेस व तिच्या दोन मुलांना बेकायदेशीरपणे घरात आणले. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
जबरदस्तीने घरातून बाहेर काढले. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pune Crime | Immoral ‘relationship’ with another woman claiming to be in the company in lockdown

 

हे देखील वाचा :

EPS-95 अंतर्गत अनाथ मुलांना सुद्धा मिळते पेन्शन, EPFO ने सांगितले त्यांना केव्हापर्यंत मिळत राहील आर्थिक मदत?

Pune Crime | सट्ट्यात हरलेल्या 4 लाखांच्या वसुलीसाठी अपहरण ! जबरदस्तीने ऐवज काढून घेतला, कोंढव्यातील घटना

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मोठी घोषणा; म्हणाले – ‘शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना 5 एकर जमीन देणार’

 

Related Posts