IMPIMP

MLA Amol Mitkari | ‘ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, ज्या दिवशी…’, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा सरकारला इशारा

by nagesh
MLA Amol Mitkari | amol mitkari criticized shinde fadnavis government after arrest nitin deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अकोल्यातील पाणीपुरवठा योजनेवरील (Water Supply Scheme) स्थगिती उठवण्याच्या मागणीवरुन बाळापूरचे
आमदार नितीन देशमुख (Balapur MLA Nitin Deshmukh) यांनी अकोला ते नागपूर अशी ‘जलसंघर्ष’ यात्रा काढली होती. ही यात्रा गुरुवारी नागपूर
शहरात दाखल होणार होती. परंतु नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) या यात्रेला वेशीवरच रोखलं आणि देशमुख यांच्यासह अनेक कार्य़कर्त्यांना
ताब्यात घेतले. या प्रकरणावरुन महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis
Government) जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी यावरुन सरकारला लक्ष केलं
आहे. तसेच हीच सैतानी साम्राज्याची सुरुवात असल्याचे अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले, तेव्हापासून लोकशाही (Democracy) संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला. याचे जिवंत उदाहरण आज बघायला मिळालं. पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख यांच्यावर बेकायदेशीर कारवाई केली. त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक (Arrest) केली. हीच सैतानी साम्राज्याची सुरुवात आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारने हे लक्षात ठेवावे की चार दिवस सासूचे आणि चार दिवस सूनेचे असतात. ज्या दिवशी महाविकास आघाडी सत्तेत येईल, तेव्हा हिशोब दिला जाईल, असा इशारा अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी दिला आहे.

 

 

राज्यात नेमकं चाललंय काय?

याच मुद्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर (State Government) टीका केली. नितीन देशमुख पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढत होते. त्याचा सरकारला त्रास होण्याचं कारण काय? बळापूर भागातील तीन महिन्याचं बाळही खारयुक्त पाणी पिते. या पाण्यामुळे लोकांचे जीवन संकटात आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाण्याची योजना मंजूर केली होती. परंतु देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यावर स्थगिती आणली.
नितीन देशमुख हेच खारयुक्त पाणी फडणवीसांना दाखवण्यासाठी नागपूरला जात होते. मात्र सरकारने त्यांना अडवलं. राज्यात नेमकं चाललंय काय? हे सरकार मोगलाई परत आणतय का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MLA Amol Mitkari | amol mitkari criticized shinde fadnavis government after arrest nitin deshmukh

 

हे देखील वाचा :

Roll Ball World Cup Tournament In Pune | उद्यापासून (दि. 21) रंगणार रोलबॉल विश्व करंडक स्पर्धेचा थरार ! 27 देश विजेतेपदासाठी भिडणार ; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

CM Eknath Shinde | अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था ठेऊन; शहर विकासावर आपल्या कारकीर्दीची छाप सोडावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँच : वाकड पोलिस स्टेशन – आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या 2 बुक्कींना अटक

 

 

Related Posts