IMPIMP

MLA Manisha Kayande | ठाकरे गटाला मोठा धक्का! मनीषा कायंदे नॉट रिचेबल; शिंदे गटात करणार प्रवेश?

by nagesh
MLA Manisha Kayande | mla-manisha-kayande-to-join-shinde-shiv-sena-soon-uddhav-thackeray-shivsena-anniversary-not-reachable

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – MLA Manisha Kayande | शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठे धक्के बसताना दिसत आहेत. नुकतेच शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा (Shishir Shinde Resignation) दिला आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे  शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यापासून ठाकरे गटाला धक्का बसताना दिसत आहे. ठाकरे यांच्या महाशिबिराच्या दिवशी आमदार मनीषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मनीषा कायंदे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार का, याबाबत चर्चाना उधाण आले आहे.

कोण आहेत मनिषा कायंदे?

मनिषा कायंदे (ठाकरे गट) या विधानपरिषदेच्या आमदार आहेत.
भाजपकडून 2009 ला सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढल्या होत्या . त्यानंतर 2012 साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. 2018 साली त्यांना ठाकरेंनी विधानपरिषदेची जबाबदारी दिली होती. आता आमदार कायंदे या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Web Title : MLA Manisha Kayande | mla-manisha-kayande-to-join-shinde-shiv-sena-soon-uddhav-thackeray-shivsena-anniversary-not-reachable

Related Posts