IMPIMP

Pune Bibvewadi Fire News | पुणे : बिबवेवाडी परिसरात गोदामांना भीषण आग; मंडप साहित्याच्या गोदामासह 20 गोदाम अग्नीच्या भक्ष्यस्थानी*

by nagesh
Pune Bibvewadi Fire News | Fire breaks out in godowns in Gangadham area; 20 godowns with a godown of pavilion materials at the altar of fire

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Bibvewadi Fire News | बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम येथील मंडपाच्या साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग 20 गोदामांपर्यंत पसरली आहे. गेल्या 2 तासांपासून ही आग भडकली असून आकाशात दूरवर धुराचे मोठे लोट दिसून येत आहे. (Pune Bibvewadi Fire News)

अग्निशमन दलाच्या भवानी पेठेतील मुख्य कार्यालयातूनही (Pune Fire Brigade) या आगीचे आकाश उठलेले लोट दिसून येत आहेत. बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम येथील आईमाता येथील एका गोदामाला रविवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाला याची माहिती 8 वाजून 55 मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या. मंडपाच्या गोदामाला सर्वप्रथम आग लागली. ही आग शेजारी असलेल्या इतर 3 गोदामापर्यंत पसरली आहे.

या परिसरात 20 ते 30 गोदामे असून ही आग आणखी पसरु नये,
यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
दोन तासाहून अधिक काळ लोटला तरीही अद्याप आगीवर नियंत्रण मिळविले शक्य झाले नाही.
विविध साहित्याचे 20 गोडाउन आगीच्या भक्ष्यस्थानी गेले आहेत. पुणे व PMRDA
अशी एकुण 22 अग्निशमन वाहने घटनास्थळी असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.

Web Title : Pune Bibvewadi Fire News | Fire breaks out in godowns in Gangadham area; 20 godowns with a godown of pavilion materials at the altar of fire

Related Posts