IMPIMP

MNS Leader Vasant More | प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी वसंत मोरेंची अनोखी शक्कल, “माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणार्‍यांना …

by nagesh
MNS Leader Vasant More | how close is my relationship with mns chief raj thackeray vasant more removed the old banner and showed it see video

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – मनसेचे नेते आणि पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक वसंत मोरे (MNS Leader Vasant More) गेले अनेक दिवस चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे (MNS Leader Vasant More) पुणे शहर कार्यालयातील पदाधिकाऱ्यांमुळे पक्षावर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर उघड नाराजी बोलून दाखवली आहे. त्यानंतर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी पुणे दौऱ्यावर असताना वसंत मोरे यांना बोलावून त्यांची बाजू जाणून घेतली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वसंत मोरे (MNS Leader Vasant More) पुणे शहर कार्यालयाचे पदाधिकारी आणि विशेषतः राजेंद्र (बाबू) वागसकर यांच्यावर नाराज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. मनसे पुणे शहर कार्यालय त्यांना डावलत असल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला आहे. मात्र, मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी वसंत मोरे चुकीची माहिती देत असल्याचे म्हणाले आहे. तसेच वसंत मोरे यांनी माध्यमाशी बोलण्याअगोदर कोअर कमिटीमध्ये बोलावं, असेही बाबू वागसकर म्हणाले.

 

 

 

वसंत मोरे ताकदवान, हे ठरवणारे तुम्ही माध्यमच आहात, असा चिमटाही बाबू वागसकर यांनी काढला होता.
त्यानंतर वसंत मोरे यांनी आज फेसबुक पोस्ट टाकली आहे.
वसंत मोरे पोस्टद्वारे म्हणतात, ‘मागच्या महिन्यात एका कार्यक्रमानंतर मांडववाल्याने राज ठाकरे आणि
माझे मांडवातले २ उभे बॅनर काढले तसेच एकमेकांना समोरासमोर बांधले.
दुपारी अमित ठाकरेंना भेटून आल्यानंतर म्हणलो, माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणारांना उत्तर द्यावे,
म्हणून ते बॅनर शोधून काढले आणि म्हणलो ते ऑफिसला लावून टाकावेत म्हणजे सर्वांना उत्तरे मिळतील…पुढे काय झाले ते तुम्हीच पाहा…’

 

व्हिडिओमध्ये वसंत मोरे त्यांचा आणि राज ठाकरेंचा बॅनर एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसतात,
पण ते बॅनर दूर होत नाहीत या प्रयत्नात दोन्ही बॅनर फाटले असता वसंत मोरे म्हणतात,
‘राज ठाकरे आणि वसंत मोरेंचे बॅनर वेगळे करायला गेलो, ते फाटले पण सहजासहजी वेगळे झाले नाहीत.
हेच कारण आहे की वसंत मोरे मनसे सोडून जात नाही. ‘

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MNS Leader Vasant More | how close is my relationship with mns chief raj thackeray vasant more removed the old banner and showed it see video

 

हे देखील वाचा :

Pune Crime | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याच्या कार्यालयातून बोलतोय म्हणत पैशांची मागणी

Ahmednagar Crime | कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन न केल्याने विद्यार्थ्याची शिक्षिकेला शिवीगाळ

 

Related Posts