IMPIMP

Pune Crime | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्याच्या कार्यालयातून बोलतोय म्हणत पैशांची मागणी

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कार्यालयातून बोलत आहे, असे सांगून पैसे मागितल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवडच्या चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत शिवदास साधू चिलवंत यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चिलवंत हे मेट्रोच्या खासगी सुरक्षा एजन्सीचे व्यवस्थापक आहेत. याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विट करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि हा प्रकार माझ्या कार्यालयाशी निगडित नाही, असे म्हटले आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी तक्रारदार शिवदास साधू चिलवंत यांना एका अज्ञात व्यक्तीचा त्यांच्या मोबाइलवर फोन आला. ‘मी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून बोलतो आहे, तुम्ही उस्मानाबाद येथील आहात’, असे म्हणत पैशांची मागणी अज्ञाताने केली. तसेच चिलवंत यांना अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी चिलवंत यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. (Pune Crime)

 

धनंजय मुंडे यांनी मात्र ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मी किंवा माझ्या कार्यालयातून असा कोणताही फोन कोणी केलेला नाही.
या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी, असे मी आवाहन करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

 

Web Title :- Pune Crime | Demanding money saying that he is speaking from the office of a big leader of the NCP Congress party

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | शस्त्र परवान्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची 9 लाखांची फसवणूक; वाकड परिसरातील घटना

Pune Minor Girl Rape Case | बदनामीची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; येरवडा परिसरातील घटना

Ahmednagar Crime | कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन न केल्याने विद्यार्थ्याची शिक्षिकेला शिवीगाळ

 

Related Posts