IMPIMP

MNS On Shivsena | ‘औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का?’; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

by nagesh
MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS On Shivsena | औरंगाबादमध्ये (Aurangabad) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची सभा होणार आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडीत चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान नुकतंच औरंगजेबाच्या कबरीवरून मोठे वादंग निर्मण झाले होते. त्यावरूनही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. (MNS On Shivsena)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मनसेचे नेते गजानन काळे (MNS Leader Gajanan Kale) यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “तुम्ही सभेमध्ये संभाजीनगर म्हटलं म्हणजे झालं का? हे प्रत्यक्ष कधी होणार?” असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. तसेच, “संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का?” असा जोरदार सवाल करत गजानन काळेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे. (MNS On Shivsena)

 

 

गजानन काळे म्हणाले, “या सभेसाठी शिवसेनेनं होय. संभाजीनगर.. असं म्हणत बॅनरबाजी केली आहे. परंतु तुम्ही सभेत संभाजीनगर म्हणायचं, एवढं करून झालं का? औरंगाबादचं संभाजीनगर कधी होणार मुख्यमंत्री महोदय?” असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच, ‘भाषणाची स्क्रिप्ट बारामती वरून आल्यावर अवघड वाटतंय सगळं.’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटाही काढला आहे.

 

Web Title :- MNS On Shivsena | CM uddhav thackeray aurangabad rally mns leader gajajan kale questions about aurangzebs grave

 

हे देखील वाचा :

PF Interest Rates | मोदी सरकारकडून PF व्याजदरात घट; ‘या’ 5 योजनेतून होईल मोठा फायदा, जाणून घ्या

Pune Crime | ‘तू लेडिजला उचलायला जेन्टसला कशाला सांगतेस, मी इथला भाई ! बिबवेवाडीत भाईगिरी करणार्‍यांकडून वाहतूक पोलिसांना गुंडांची शिवीगाळ

Pune Crime | लाकडी दांड्याने डोक्यात मारुन तरुणाचा खून; मांजरीमधील महादेवनगर येथील घटना

 

Related Posts