IMPIMP

MP Sunil Tatkare | खासदार सुनील तटकरे यांचा शिंदे गट आणि भाजपाला टोला; “बालहट्ट पूर्ण केला पाहिजे…”

by nagesh
MP Sunil Tatkare | ncp mp sunil tatkares reaction on the shinde groups demand for two ministerial posts in center and a governors post to the bjp

सरकारसत्ता ऑनलाईन  –  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि भाजपाला (BJP) टोला लगावला आहे. सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी शिंदे गटाच्या दोन केंद्रीय मंत्रिपदाच्या (2 Central Ministers) आणि दोन राज्यपाल (Governer) पदाच्या मागणीला बालहट्ट म्हणाले आहे. शिंदे गटाकडून भाजपाकडे केंद्रात दोन मंत्रिपद आणि दोन राज्यपाल पदांची मागणी करण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

“भाजपाला फार मोठा आधार शिंदे गटाकडून मिळाल्याचं भासवलं जात असल्यामुळेच केंद्रातील दोन मंत्रिपदं खरंतर दोन म्हणजे सुद्धा कमी आहेत, जास्त असली पाहिजेत आणि राज्यपाल पदं दोनच का त्यापेक्षाही अधिक असली पाहिजेत., कारण शिंदे गटाकडे या सगळया पदासांठी लायक असणाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्याने, कदाचित यापेक्षाही जास्त मागणी त्यांनी केली पाहिजे आणि त्यांचा हा बालहट्ट भाजपानेही पुरवला पाहिजे.” असे खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांच्याकडे तशी मागणी केली आहे.
त्यांच्या या मागणीवर अमित शहा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि
खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
त्यामुळे त्यांनाच केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- MP Sunil Tatkare | ncp mp sunil tatkares reaction on the shinde groups demand for two ministerial posts in center and a governors post to the bjp

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘शिवसेनेच्या ‘त्या’ गोष्टीचे अजूनही मनात शल्य आहे’ – देवेंद्र फडणवीस

CNG Price Hike In Pune | महागाईचा मारा कायम, पुण्यात सीएनजी दर पुन्हा वाढले

Marathi Actress Sonali Kulkarni | मराठमोळी ‘हि’ अभिनेत्री आपल्या नवऱ्याबरोबर रमली शेतात, Video झाला व्हायरल

Maharashtra Police Bharti 2022 | जाणून घ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आणि त्या संबंधीच्या अटी

 

Related Posts