IMPIMP

Devendra Fadnavis | ‘शिवसेनेच्या ‘त्या’ गोष्टीचे अजूनही मनात शल्य आहे’ – देवेंद्र फडणवीस

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis react uddhav thackeray challenge get election loksabha vidhansabha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेला 2019 मध्ये मोदी-शहा यांच्या पाठिंब्याने घवघवीत यश मिळाले होते. आणि आता देखील त्यांच्याच पाठिंब्याने राज्यात सत्तांतर झाले आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजपने 2024 च्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेने 2019 ला आमच्यासोबत बेईमानी केली. पण आता अमित शहा (Amit Shah) यांच्या पाठिंब्याने राज्यात सत्तांतर झाले आहे. अमित शहांच्या भक्कम पाठबळामुळेच राज्यातील बेईमानांचे सरकार गेले. अमित शहांच्या सुयोग्य नियोजनामुळे भाजपने निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सत्तांतरात महत्वाची भूमिका पार पाडल्याची सांगताच, फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. (Devendra Fadnavis)

 

राज्यात 2019 च्या निवडणुकांनंतर राज्यात आतापर्यंत 3 सरकारे आली. सर्वप्रथम फडणवीस-पवार हे दीड
दिवसांचे सरकार आले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आले. आणि शिवसेनेत बंड करुन मुख्यमंत्री शिंदे
(CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात गेल्या चार महिन्यापासून तिसरे सरकार आले आहे. शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे भाजपच्या मनात 2019 साली सरकार स्थापन न करता आल्याचे शल्य अजूनही मनात कायम आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ते जाहीर सभेत बोलून दाखविले. 2014 साली शिवसेनेने केवळ 4 जागांसाठी युती तोडली, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | alliance with shiv sena broke in just 4 seats devendra fadnavis still

 

हे देखील वाचा :

CNG Price Hike In Pune | महागाईचा मारा कायम, पुण्यात सीएनजी दर पुन्हा वाढले

Marathi Actress Sonali Kulkarni | मराठमोळी ‘हि’ अभिनेत्री आपल्या नवऱ्याबरोबर रमली शेतात, Video झाला व्हायरल

Gajanan Kirtikar | ‘मला तोंड दाबून बुक्यांचा मार असह्य झाला आणि मी सेना सोडली’ – गजानन कीर्तिकर

 

Related Posts