IMPIMP

MP Udayanraje On Govt Officers – Satara News | “काम नाही केलं, तर वाडगं घेऊन..”, उदयनराजेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

by nagesh
Udayanraje Bhosale | udayanarajes criticism of governor and mangalprabhat lodha

सातारा :  सरकारसत्ता ऑनलाइन  MP Udayanraje On Govt Officers – Satara News | खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेचा विषय असते. शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. “काम नाही केलं, तर वाडगं घेऊन बसण्याची वेळ येईल’, असे ते यावेळी म्हणाले (MP Udayanraje On Govt Officers – Satara News )

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

“करेक्ट बोलतो, म्हणून कॉलर उडवतो”

 

साताऱ्यातील कृषी औद्योगिक वाहन प्रदर्शन (Agricultural Industrial Vehicle Exhibition) उद्घाटन कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंनी आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर स्पष्टीकरण देताना म्हणाले कि, “मी करेक्ट बोलतो, म्हणून कॉलर उडवतो. मी नेहमीच मनापासून बोलतो”, असे म्हणत उदयनराजे भोसलेंनी पुन्हा एकदा कॉलर उडवताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना चांगलं काम करण्याचा सल्ला दिला. “काम नाही केलं, तर वाडगं घेऊन बसण्याची वेळ येईल’,असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. (MP Udayanraje On Govt Officers – Satara News )

 

 

शिवेंद्रसिंहराजेंना खोचक टोला

 

“शिवेंद्रसिंहराजे (MLA Shivendraraje Bhosle) यांचे माझ्यावर भरपूर प्रेम आहे.
त्यामुळे माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसही जात नाही.
मी माझा इतका प्रचार करत नाही, तितका ते माझा प्रचार करतात. माझे ते मुख्य प्रचारक आहेत.
आरशापुढे उभे राहिलो तर मी माझं एक वेळ नाव विसरेन.
पण ते आरशासमोर उभे राहिले तरी भांग पाडताना त्यांना माझं नाव दिसते”,
असे म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंना खोचक टोला लगावला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Udayanraje On Govt Officers – Satara News | bjp mp udayanraje bhosle collar style slams government officers

 

हे देखील वाचा :

NCP Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | ज्या-ज्यावेळी शिवसेना फुटली तेव्हा निवडणुकीत आमदार पडले, राणे तर पोटनिवडणुकीतही पडले; अजित पवारांनी डिवचले

Chandrakant Patil | ही कुठली हिंदू संस्कृती?, चंद्रकांत पाटलांच्या आई-वडिलांना शिवी देण्यासंदर्भातील वक्तव्यावरुन नाना पटोलेंचा सवाल

RSS Chief Mohan Bhagwat On Cast System | धर्मशास्त्राला जातीगत विषमता अमान्य, जातीव्यवस्था हद्दपार व्हावी : मोहन भागवत

Maharashtra Politics | 40 आमदार पैशांचा पाऊस पाडतायेत, कुठून आले कोट्यवधी रूपये, आमचे बारीक लक्ष; अजित पवारांचा इशारा

 

Related Posts