IMPIMP

Aadhaar Card Security | आधार धारकांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ टिप्स फॉलो करून आधार डाटा ठेवा सुरक्षित, जाणून घ्या डिटेल्स

by nagesh
Aadhaar Card Security | aadhaar card use these services to secure personal data on aadhaar card know detail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Aadhaar Card Security | बदलत्या काळानुसार आधार कार्ड (Aadhaar Card) ची उपयुक्तता खूप वाढली आहे. ते एक अतिशय महत्त्वाचे आयडी म्हणून वापरले जाते. व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, लिंग अशी महत्त्वाची माहिती आधार कार्डमध्ये नोंदवली जाते. अशावेळी आधारशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार आधारद्वारे बँक खात्याचे तपशील मिळवून अनेक वेळा खाते रिकामे करतात. यासाठी आधार डेटा वाचवण्याकरता UIDAI लोकांना अनेक उपाय सांगत आहे. UIDAI अशा अनेक सेवा पुरवते ज्याद्वारे आधारचा गैरवापर टाळता येऊ शकतो. याविषयी जाणून घेऊया (Aadhaar Card Security)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

व्हर्च्युअल आधार वापरा

पुष्कळदा फिजिकल आधार कार्डद्वारे डेटा चोरीच्या घटना समोर येतात. हे टाळण्यासाठी व्हर्च्युअल आधार कार्ड वापरू शकता. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा My Aadhaar Portal वर जाऊन Virtual ID तयार करू शकता. यानंतर हे व्हर्च्युअल आधार कार्ड सहज वापरू शकता. हे आधार हरवण्याचीही शक्यता कमी आहे.

 

आधार लॉक सेवा वापरा

तुम्ही UIDAI ची बायोमेट्रिक लॉकिंग सुविधा (Biometric Locking Facility) वापरू शकता. यामुळे आधारचा बायोमेट्रिक्सचा गैरवापर टाळता येईल आणि तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचे आधार वापरू शकणार नाही. यासाठी UIDAI ची अधिकृत वेबसाइर्ट www.uidai.gov.in ला भेट द्या. यानंतर My Aadhaar पर्याय निवडा. यानंतर Aadhaar Services निवडा आणि Lock/Unlock Biometrics निवडा. पुढे, आधार क्रमांक टाकून ओटीपी भरा. यानंतर आधार ताबडतोब लॉक आणि अनलॉक होईल. (Aadhaar Card Security)

 

आधार हिस्ट्री जाणून घ्या

UIDAI आधार यूजार्सना आधार वापराची हिस्ट्री जाणून घेण्याची सुविधा देखील देते.
तुम्ही तुमचे आधार कुठे-कुठे वापरले हे येथे समजते.
आधार हिस्ट्री जाणून घेण्यासाठी, यूआयडीएआयची वेबसाइट किंवा एम-आधार अ‍ॅप वापरावे.
याद्वारे आधारची मागील ६ महिन्यांची हिस्ट्री तपासता येईल.
जर आधारचा गैरवापर झाला असेल तर UIDAI ला त्याची माहिती देऊ शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-Aadhaar Card Security | aadhaar card use these services to secure personal data on aadhaar card know detail

 

हे देखील वाचा :

Pune News | सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे कॉँग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन

Chetan Sharma | चेतन शर्मा यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड

Smita Gondkar | अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

 

Related Posts