IMPIMP

Sachin Vaze : ते पीपीई किट नाही तर पांढरा कुर्ता, अँटिलिया बाहेरील ‘ती’ व्यक्ती वाझेच?

by pranjalishirish
mukesh ambani security scare nia suspects sachin vaze wear white kurta not ppe kit

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  उद्योगपती मुकेश अंबानी अँटिलिया बाहेर स्फोटकाने भरलेल्या गाडीचा तपास सध्या एनआयए करीत आहे. अंबानी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती पीपीई किट घातल्याचे दिसून येत आहे. ही व्यक्ती नेमकी कोण याचा शोध एनआयएकडून केला जात आहे. सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती सचिन वाझे Sachin Vaze आहे की आणखी कोणी याचा शोध घेतला जात आहे. याच दरम्यान आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेली व्यक्ती सचिन वाझे  Sachin Vaze असल्याचा संशय एनआयएच्या अधिकाऱ्यांना आहे. अंबानींच्या घराबाहेर दिसलेल्या इनोव्हा कारमधून उतरलेल्या व्यक्तीने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातल्याचे सुरुवातीच्या तपासात समोर आले होते. मात्र, सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीने पीपीई किट नाही तर पांढरा कुर्ता घातल्याचे तपासात समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली असता ही नवीन माहिती समोर आली आहे.

सीसीटीव्हीमध्ये काही कळू नये, स्वत:ची ओळख पटू नये म्हणून सचिन वाझे Sachin Vaze यांनी पीपीई किट नाही तर पांढरा कुर्ता परिधान केला असावा. पीपीई किट घातले तर कोणालाही सहज संशय येण्याची शक्यता असल्याने त्यांनी पांढरा कुर्ता घातला होता. एवढेच नाही तर डोक्याला रुमाल बांधून तोंडाला मास्क लावला, असा संशय अधिकाऱ्यांना आहे. याची पडताळणी करण्यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता यामध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे केवळ डोळेच दिसत असल्याचे समोर आले आहे.

वाझे टेक्नोसॅव्ही पोलीस अधिकारी

सचिन वाझे हे टेक्नोसॅव्ही आणि तंत्रज्ञानाचा अतिशय कौशल्याने वापर करणारे अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख आहे. मात्र, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी चौकशीच्या वेळी वाझे यांना त्यांच्या मोबाईलबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी माझा मोबाईल कामाच्या गडबडीत गहाळ झाल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी वाझे यांचा लॅपटॉप मिळाला आहे. मात्र, लॉपटॉप फॉरमॅट करण्यात आला असून त्यामध्ये कोणतीच माहिती नाही. वाझे हे एनआयएच्या अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

Related Posts