IMPIMP

Mula Mutha Riverfront Development | मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेच्या बाणेर-बालेवाडी-औंध टप्प्याची निविदा लवकरच ! पिंपरी चिंचवड महापालिकेने निम्मा खर्च करावा – महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची मागणी

by nagesh
Pune PMC - PM Awas Yojana | As Pradhan Mantri Awas Yojana has been discontinued, there is no new project under this scheme in the future - IAS Vikram Kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Mula Mutha Riverfront Development | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेतील बाणेर -बालेवाडी-औंध
(Baner-Balewadi-Aundh) भागातील कामाची निविदा (Tender) लवकरच काढण्यात येणार आहे. सुमारे आठ कि.मी. चा हा स्ट्रेच पुणे आणि पिंपरी
चिंचवड महापालिकेच्या Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) हद्दीत आहे. त्यामुळे या स्ट्रेचसाठी येणार्‍या सुमारे 610 कोटी रुपयांच्या कामांचा निम्मा खर्च पिंपरी चिंचवड महापालिकेने द्यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली. (Mula Mutha Riverfront Development)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे महापालिकेच्यावतीने मुळा- मुठा नदी काठ सुधार योजना राबविण्यात येत आहे. 11 टप्प्यांमध्ये सुमारे 44 कि.मी. लांबीच्या नदी काठाचे सुशोभीकरण व अन्य नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. योजनेतील दोन टप्प्यांच्या कामाला यापुर्वीच सुरूवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे भुमिपूजनही झाले आहे. या योजनेला गती देण्यासाठी बाणेर, बालेवाडी आणि औंध या टप्प्याची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Mula Mutha Riverfront Development)

 

मुळा नदी ही पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका यांच्या सीमेवरून वाहते. पुणे महापालिकेच्या हद्दीतील बाणेर, बालेवाडी, औंध हा भाग या नदीच्या काठावर आहे. पुणे महापालिकेने मुळा नदीच्या दोन्ही बाजुच्या काठांच्या सुधारासाठी आराखडा तयार केला आहे. याचा खर्च सुमारे सहाशे दहा कोटी रुपये इतका असुन, यातील निम्मा खर्च हा पिंपरी चिंचवड महापालिकेने करावा अशी मागणी पुणे महापालिकेने केली आहे. यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकांशी चर्चा सुरु असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

 

सर्व सुचनांवर काम सुरु

मुळा- मुठा नदी सुधार योजनेसंदर्भात सिंचन विभाग आणि पर्यावरण प्रेमींनी काही आक्षेप आणि सुचना केल्या आहे. याबाबत पुणे महापालिका प्रशासन काम करीत आहे. त्यांना लेखी उत्तरही दिले गेले आहे. या नदीच्या पाणी वहन क्षमतेवर कोणताही परीणाम होणार नाही, नदीकाठ सुधारणेत केल्या जाणार्‍या बांधकामाचा व्यावसायिक वापर केला जाणार नाही, तसेच या नदीतील पाणी स्वच्छ राहण्यासाठी त्या पाण्यावर प्रक्रीया करूनच ते नदीत सोडले जाणार आहे असेही आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

इतरही निविदा लवकरच काढणार

खडकी स्टेशन (Khadki Railway Station) येथील जुना पुणे – मुंबई महामार्ग (Old Pune-Mumbai Highway) हा चौपदरी केला जाणार आहे. या कामाची निविदा काढण्यात आली आहे. तसेच देवाची उरुळी येथील कचरा डेपोतील शिल्लक कचर्‍यावर प्रक्रीया करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. सुस – म्हाळुंगे – बावधन येथील पाणी प्रकल्पाच्या कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहे.

 

Web Title :- Mula Mutha Riverfront Development | Tender for Baner-Balewadi-Aundh Phase of Mula-Mutha River Bank Improvement Scheme Soon! Pimpri Chinchwad Municipal Corporation should spend half – Municipal Commissioner Vikram Kumar’s demand

 

हे देखील वाचा :

Pune PMC Election 2022 | ओबीसी आरक्षणामुळे पुणे महापालिका निवडणुकीत होणार मोठे फेरबदल ! ओबीसी व महिला आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार; त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनेच निवडणूक सप्टेंबरमध्ये?

Prithviraj Chavan | ‘घाईगडबडीमध्ये राजीनामा देवून उध्दव ठाकरेंनी फार मोठी चुक केली’ – पृथ्वीराज चव्हाण

RBI Digital Currency | देशात लवकरच सुरू होणार डिजिटल करन्सी, घाऊक आणि किरकोळ क्षेत्रासाठी टप्प्याटप्प्याने होत आहे काम

 

Related Posts