IMPIMP

RBI Digital Currency | देशात लवकरच सुरू होणार डिजिटल करन्सी, घाऊक आणि किरकोळ क्षेत्रासाठी टप्प्याटप्प्याने होत आहे काम

by nagesh
RBI | rbi going to make big announcement big profit will be given on fixed deposit know how

नवी दिल्ली : वृत्तसंस्था RBI Digital Currency | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) केंद्रीय बँक डिजिटल चलन योजना (Central Bank Digital Currency) टप्प्याटप्प्याने घाऊक आणि किरकोळ क्षेत्रात लागू करण्याच्या प्रक्रियेत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) कार्यकारी संचालक (फिनटेक) अजय कुमार चौधरी यांनी ही माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. (RBI Digital Currency)

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सीबीडीसी (CBDC) सुरू करण्याची घोषणा केली होती. अर्थ विधेयक 2022 मध्ये यासाठी, आरबीआय कायदा, 1934 च्या आवश्यक भागांमध्ये आवश्यक सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजय कुमार चौधरी म्हणाले की हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आरबीआयला प्रथम पायलट प्रोजेक्ट आणि नंतर (CBDC) जारी करणे शक्य झाले आहे. चौधरी फिक्की द्वारे आयोजित ’पिकअप फिनटेक कॉन्फरन्स आणि अवॉर्ड्स’ मध्ये बोलताना म्हणाले, आरबीआय घाऊक आणि किरकोळ दोन्ही क्षेत्रांमध्ये सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) च्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीवर काम करत आहे. (RBI Digital Currency)

 

भारताचे अधिकृत डिजिटल चलन 2023 च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. ते एका खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक वॉलेटपैकी एकाशी जोडले जाईल. आरबीआयच्या योजनेनुसार, सीबीडीसी (CBDC) हे एक असे डिजिटल चलन असेल जे सर्वत्र स्वीकार्य असेल.

 

वेगाने वाढणार्‍या डिजिटल पेमेंट क्षेत्रातील फिनटेकच्या भूमिकेबद्दल बोलताना अजय कुमार चौधरी म्हणाले की, आरबीआयने नाविन्यपूर्ण पद्धतींना प्रोत्साहन दिले आहे आणि ते फिनटेकद्वारे ऑफर केलेल्या उत्पादने आणि सेवांशी संबंधित फायदे आणि जोखमींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

 

ते म्हणाले की, देशात फिनटेक अवलंबण्यात झपाट्याने वाढ झाल्यामुळे, रिझर्व्ह बँकेने 2014 मध्ये पेमेंट बँक,
2016 मध्ये अकाऊंट अ‍ॅग्रिगेटर, 2017 मध्ये प्रीपेड इन्स्ट्रूमेंट, 2017 मध्ये पीअर-टू-पीअर लेंडिंग आणि 2018 मध्ये
इनव्हॉइस डिस्काउंटिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.
फिनटेकने आधीच देशात यूपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) सुरू करून डिजिटल पेमेंट क्षेत्रात ठसा उमटवला आहे.
आकड्यांचा संदर्भ देत ते म्हणाले की या वर्षी आतापर्यंत यूपीआय व्यवहारांमध्ये 323 बँकांचा सहभाग दिसून आला आहे
आणि 130 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे 5.9 अब्ज मासिक व्यवहार नोंदवले गेले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय आहे सीबीडीसी
सीबीडीसी हे डिजिटल किंवा आभासी चलन आहे, परंतु त्याची तुलना गेल्या दशकात वाढलेल्या आभासी चलने किंवा क्रिप्टोकरन्सीशी होऊ शकत नाही.
खाजगी आभासी चलने एखाद्या व्यक्तीच्या कर्ज किंवा दायित्वांबद्दल कोणतीही माहिती प्रदान करत नाहीत,
कारण ती जारी करणारी कोणतीही निश्चित व्यक्ती नसते.

 

Web Title :- RBI Digital Currency | rbi digital currency for wholesale and retail segments is under process

 

हे देखील वाचा :

Pune News | अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तरुणांना करिअर मार्गदर्शन

Work From Home New Rule | WFH बाबत आला सरकारचा नवीन नियम, 50% कर्मचार्‍यांनी ऑफिसमध्ये येणे आवश्यक

Pune Crime | लोणावळा परिसरात क्रिकेट सामन्यावर सट्टा, चार जण गजाआड; 2.88 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts