IMPIMP

Multibagger Penny Stock | अवघ्या 1 आठवड्यात पैसे दुप्पट करणारा पेनी स्टॉक, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

by nagesh
Multibagger Penny Stock | raj rayon industries stock hits 52 week high today delivered 558 percent return in 38 days

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Multibagger Penny Stock | स्टॉक मार्केटच्या जगतात दररोज कोणता ना कोणता स्टॉक काहीतरी विशेष करत असतो. विशेषता असे शेयर जे फंडामेंटली खुप मजबूत आहेत, परंतु काही कारणामुळे खालच्या स्तरावर आहेत. एक असाच पेनी स्टॉक AK Spintex आहे. (Multibagger Penny Stock)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एके स्पिनटेक्स नावाचा हा शेयर टेक्सस्टाईल इंडस्ट्रीचा स्टॉक आहे. या शेयरने याच आठवड्यात केवळ 5 ट्रेडिंग सेशन्समध्येच 100 टक्केने रिटर्न दिला आहे.

 

मागील आठवड्यात म्हणजेच 30 डिसेंबर 2021 ला AK Spintex चे क्लोजिंग 24.50 रुपये झाले होते. आज 7 जानेवारी 2022 आहे आणि हा स्टॉक 52.35 पैशांवर अप्पर सर्किट (Upper Circuit) लॉक केले आहे.

 

अवघ्या सात दिवसात 114% चा मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger return) दिला आहे. म्हणजे जर एखाद्याने एक आठवड्यापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आतापर्यंत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

AK Spintex ची प्राईस हिस्ट्री
बीएसई सेन्सेक्समध्ये या शेयरने 10 जुलै 2017 रोजी 84.35 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली. तेव्हापासून हा एके स्पिन्टेक्स शेअर सातत्याने घसरत आहे. 30 एप्रिल 2020 रोजी तो 10 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. तेव्हापासून हा शेयर रु. 10 ची नीचांकी पातळी आणि रु. 30 च्या सर्वोच्च पातळीच्या दरम्यान होता. 30 डिसेंबर 2021 रोजी, या स्टॉक 24.50 रुपयांवर बंद झाला. (Multibagger Penny Stock)

 

31 डिसेंबर 2021 रोजी AK Spintex शेअर 24 रुपयांवर उघडला, परंतु एका दिवसाच्या ट्रेडिंगनंतर 28.25 रुपयांवर शानदार प्रकारे बंद झाला. नवीन वर्ष 2022 त्याचे भरारी घेणारे ठरले आहे. आज 7 जानेवारी 2022 रोजी हा शेयर 52.35 पैशांवर आहे.

या स्टॉकने फक्त 7 दिवसात 114% चा चांगला रिटर्न दिला आहे. यानुसार, जर एखाद्याने 1 आठवड्यापूर्वी रू. 1,00,000 ची गुंतवणूक केली असेल, तर आतापर्यंत त्याला एकुण रिटर्न रू. 1,14,000 मिळाला असेल. 1,14,000 रुपयांचा परतावा आणि 1,00,000 रुपयांची गुंतवणूक म्हणजे 2,14,000 रुपये.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्याचप्रमाणे, जर एखाद्याने एप्रिल 2020 मध्ये सुमारे रू.10 च्या किमतीत गुंतवणूक केली असती, तर आजच्या रिटर्ननुसार, 424% नफा झाला असता.
याचा अर्थ असा की आतापर्यंत रू. 1,00,000 रू. 5,24,000 झाले असते.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock ak spintex share skyrockets 114 percent in one week

 

हे देखील वाचा :

Nagpur News | दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून नागपूर RSS च्या परिसरात रेकी; जिल्ह्यात खळबळ

Anil Parab | अनिल परबांचं मोठे विधान; म्हणाले – ‘एसी कामगारांना 4 वेळा संधी दिली, त्यामुळे आता…’

Post Office Internet Banking | पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल नेट बँकिंगची सुविधा, कशी करू शकता अ‍ॅक्टिव्ह? जाणून सविस्तर प्रक्रिया

 

Related Posts