IMPIMP

Nagpur News | दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून नागपूर RSS च्या परिसरात रेकी; जिल्ह्यात खळबळ

by nagesh
Nagpur News | nagpur reiki of the premises of the RSS from the terrorist organization jaish e mohammed the intelligence agency

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Nagpur News | नागपूर येथील (Nagpur News) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) महाल परिसरातील मुख्यालय, रेशीम बागमधील संघाचा डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात रेकी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद (Jaish-e-Mohammed) कडून रेकी करण्यात आल्याचे समजते. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यानंतर आता त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था (Security Arrangements) तैनात करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जैश ए मोहम्मद अतिरेकी संघटनेकडून रेकी झाली होती अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी दिली
आहे. दरम्यान, सेंट्रल एजन्सीकडून पोलिसांना ही माहिती समजल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालय, रेशीम बागमधील संघाचा डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. (Nagpur News)

 

 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी नागपुरातील कोणत्या ठिकाणांची रेकी करण्यात आली याची माहिती दिली नाही. परंतु, या प्रकरणी युएपीए कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान एका वृत्ताकडून मिळालेल्या माहितीनूसार, जम्मू-काश्मीरमधील एका तरुणाने जुलैमध्ये नागपुरात 2 दिवस वास्तव्य करून काही स्थानांची रेकी केल्याची माहिती सेंट्रल एजन्सी कडून नागपूर पोलिसांना मिळाली. तो तरूण नुकतच जम्मू-काश्मीरमध्ये अटक झाल्यानंतर सेंट्रल एजन्सीला त्याने नागपुरात ही रेकी केल्याची माहिती समोर आली. पाकिस्तानमधील काहींच्या सांगण्यावरूनच जम्मू-काश्मीरमधील तरुणाने नागपुरात रेकी केल्याची माहिती सध्या पुढे येत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Nagpur News | nagpur reiki of the premises of the RSS from the terrorist organization jaish e mohammed the intelligence agency

 

हे देखील वाचा :

Anil Parab | अनिल परबांचं मोठे विधान; म्हणाले – ‘एसी कामगारांना 4 वेळा संधी दिली, त्यामुळे आता…’

Post Office Internet Banking | पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल नेट बँकिंगची सुविधा, कशी करू शकता अ‍ॅक्टिव्ह? जाणून सविस्तर प्रक्रिया

Pune Crime | पुण्यात निवृत्त पोलीस महासंचालकांच्या बहिणीच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

 

Related Posts