IMPIMP

Multibagger Stocks | ‘हा’ शेअर्स देतोय जबरदस्त परतावा ! 15 रुपयांचा शेअर 2000 रुपयांवर; 1 लाख गुंतवणारे बनले कोट्यधीश, जाणून घ्या

by nagesh
 Share Market | how will the stock market move this week invest by keeping these factors in mind

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Multibagger Stocks | अनेक गुंतवणूकदार (Investors) आपल्या शेअर्समध्ये अधिक परतावा मिळावा यासाठी अनेक प्रयत्न करीत असतात. यासाठी कोणता शेअर्स चांगला आहे. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून असते. दीपक नायट्रेटच्या शेअर्सनं (Deepak Nitrite Shares) गुंतवणूकदारांना मस्त परतावा दिला आहे. 1 लाख रुपये गुंतवलेले गुंतवणूकदार काही वर्षांमध्ये कोट्यधीश झाले आहेत. अशी कंपनीच्या शेअर्सची कामगिरी इतकी उत्तम राहिलीय. (Multibagger Stocks)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या स्टाॅकने दहा वर्षांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 13 हजार टक्क्यांहून जादा परतावा दिला आहे. दीपक नायट्रेटचे मार्केट कॅप 27,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. दरम्यान दीपक नायट्रेटच्या शेअर्सबाबत (Deepak Nitrite Shares Price) सविस्तर जाणून घ्या. (Multibagger Stocks)

 

23 मार्च 2012 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजारावर (National Stock Exchange) दीपक नायट्रेटचे शेअर्स 14.70 रुपयांच्या पातळीवर होते. 15 फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीचे शेअर्स राष्ट्रीय शेअर बाजारावर (NSE) 2,142.50 रुपयांच्या पातळीवर होते. कंपनीच्या समभागांनी 10 वर्षापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना जवळपास 13,780 टक्के रिटर्न्स दिले आहेत. समजा एखाद्या व्यक्तीने 23 मार्च 2012 मध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता त्याचा दर 1.37 कोटी रुपये झाले असते. याचा अर्थ की, कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्या व्यक्तीला थेट 1.36 कोटी रुपयांचा लाभ होऊ शकला असता.

 

दरम्यान, 17 फेब्रुवारी 2017 मध्ये राष्ट्रीय शेअर बाजारावर (National Stock Exchange) दीपक नायट्रेटचे शेअर्स 103.65 रुपयांच्या पातळीवर होते.
15 फेब्रुवारी 2022 मध्ये कंपनीचे शेअर्स 2,142.50 रुपयांच्या पातळीवर आहेत.
दीपक नायट्रेटच्या शेअर्सने मागील पाच वर्षात सुमारे 1,850 टक्के परतावा दिला आहे.
समजा एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील,
तर आज त्या पैशांचे मूल्य 19.55 लाख रुपये झाले असते.
कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3,020 रुपये आहे. तसेच, कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांची निम्न पातळी 1,131 रुपये आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Multibagger Stocks | multibagger stocks rs 15 per share now at rs 2000 1 lakh rs investors became billionaires know details deepak nitrite stocks bse nse stock market

 

हे देखील वाचा :

LIC Agents Huge Earning | एलआयसी एजंटच्या मोठी कमाईचे रहस्य तुम्हाला माहित आहे का? कसे मिळते इतके मोठे कमीशन

Bappi Lahiri Net Worth | संगितकार बप्पीदा होते ‘एवढ्या’ कोटीचे मालक, बप्पीदांकडे होते ‘एवढे’ सोने अन् महागड्या गाड्या

WHO Quit Tobacco App | WHO ने लाँच केले ‘तंबाखू सोडा अ‍ॅप’, जगात दरवर्षी 8 मिलियन लोकांचा होतो मृत्यू

 

Related Posts