IMPIMP

Mumbai Police Welfare Fund | मुंबई पोलिसांचा खुलासा ! ‘पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी साहित्य मुंबई पोलीस कल्याण निधीतून, राज्य सरकारकडून नव्हे’

by nagesh
Maharashtra IPS Officer Transfer | IPS Hemant Nagrale has been replaced by Sanjay Pandey as the new Commissioner of Police for Greater Mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबई शहर पोलीस दलातील कार्यरत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त (diwali festival) शुभेच्छापत्र, दिवाळी फराळ, मिठाई, आणि छोटीसी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. या दिवाळी शुभेच्छा खर्चासाठी मुंबई पोलीस कल्याण निधीचा (Mumbai Police Welfare Fund) वापर करण्यात येतो. ही योजना राज्यशासनाची (Maharashtra Government) नसून पूर्णतः पोलीस कल्याण निधीची योजना (Mumbai Police Welfare Fund) आहे. यंदा मुंबई पोलीसांकरिता कार्यरत असलेल्या ६ पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीसाठी आवश्यक साहित्यावर 750 रुपये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (CP Hemant Nagrale) यांनी दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पोलीस कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्याना शिष्यवृत्ती, प्रोत्साहन, विविध अधिकारी कर्मचारी सत्कार,आरोग्यविषयक सुविधा, व्यायामशाळा, वाचनालय तसेच पोलिसांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालय दिवाळी शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू स्वरूपात दरवर्षी देत होते.

 

 

गेले दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शुभेच्छा पत्र, मिठाई आणि भेटवस्तू वितरित करताना येणाऱ्या अडचणी टाळण्याच्या उददेशाने भेटवस्तूंऐवजी सदर रकमेचे थेट साहित्य खरेदी करण्याचा पर्याय सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे.

 

‘या निर्णयामुळे पोलीस सबसिडीयरी कॅन्टीन मधून खरेदी केलेले साहित्यावर तीस टक्के सवलत मिळते आहे.
याबरोबरच यावर्षी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पसंतीचे व आवश्यक असे दिवाळी
सणासाठी लागणाऱ्या साहित्यामधील 750 रु किंमतीचे साहित्य देखील मोफत मिळणार आहे.

 

मुंबई पोलीसांकरिता कार्यरत असलेल्या ६ पोलीस कॅन्टीन मधून सदर साहित्य खरेदी करावयाचे असून ही योजना दि. 30 ऑक्टोबर पासून कार्यान्वीत करण्यात आली आहे.
अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (mumbai police commissioner hemant nagrale) यांनी दिली आहे.

 

Web Title :- Mumbai Police Welfare Fund | Mumbai police reveals! ‘Diwali literature for police personnel from Mumbai Police Welfare Fund, not from maharashtra government’

 

हे देखील वाचा :

SBI Alert | एसबीआयच्या 44 कोटी ग्राहकांसाठी कामाची बातमी ! बँकेकडून येत असलेल्या ‘या’ मेसेजकडे द्या लक्ष, जाणून घ्या काय करावे?

Mumbai Cruise Drug Case | समीर वानखेडेंना मनसेचा पाठिंबा?

Gold Price Today | धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

31 October | 31 ऑक्टोबरपूर्वी उरकून घेतली ‘ही’ 4 महत्वाची कामे तर होईल फायदा, तात्काळ जाणून घ्या डिटेल्स

 

Related Posts