IMPIMP

Mumbai- Pune Expressway Accident | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, कारची ट्रकला मागून धडक; तिघांचा जागीच मृत्यू

by nagesh
Mumbai- Pune Expressway Accident | fatal car accident on mumbai pune expressway three people died on the spot

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  –  Mumbai- Pune Expressway Accident | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. कारनं ट्रकला पाठिमागून धडक दिल्याने कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. कार मुंबईहून पुण्याकडे येत होती. उर्से टोल नाक्याजवळ (Urse Toll) कारने ट्रकला मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की अर्धी कार ट्रकखाली गेली. यामुळे तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळी आढे गावच्या हद्दीत किलोमीटर 82 जवळ झाला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार (एमएच 04 जे एम 5349) ही किलोमीटर 82 जवळ समोर जाणाऱा ट्रक (आरजे 09 जेबी 3638) ला मागून जोरात धडकली. यामध्ये कार अर्धी ट्रकच्या मागील बाजूने ट्रकखाली गेली. चालकासह दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

 

 

अपघाताची माहिती मिळताच आयआरबी (IRB) पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा व महामार्ग पोलिसांनी
(Highway Police) घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करत कार मधील सर्वांना बाहेर काढले.
अपघातात मृत्यू झालेल्या तिघांपैकी एकाची ओळख पटली आहे.
विजय विश्वनाथ खैर (रा. सातारा) असं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून इतर दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Mumbai- Pune Expressway Accident | fatal car accident on mumbai pune expressway three people died on the spot

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | फायनान्स कंपनीच्या अधिकृत टोल फ्री क्रमांकावर तरुणाची फसवणूक; नवीन क्रेडीट कार्ड पिन जनरेट करण्यास सांगून लुबाडले साडेसात लाख

Amruta Fadnavis Bribery Case | ‘देवेंद्र फडणवीस स्वत: गृहमंत्री, चौकशी करुन सत्य जनतेसमोर आणा’ – नाना पटोले

MLA Sunil Tingre | पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ! आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 

Related Posts