IMPIMP

MLA Sunil Tingre | पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ! आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

by nagesh
MLA Sunil Tingre | The funds for the development of the included villages will not be allowed to fall! Chief Minister's assurance on the attention of MLA Sunil Tingre

1 हजार 200 कोटींचा आराखडा तयार

सरकारसत्ता ऑनलाईन – MLA Sunil Tingre | पुणे महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट 34 गावांमधील या पायाभूत
सोयी सुविधांसह विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. महापालिकेच्या अंदाजपत्रकात (Pune PMC Budget) त्यासाठी विशेष निधी
देण्यासंबंधीचे आदेश महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) देण्यात आले आहेत. गावांमधील योजनांसाठी 1 हजार 200 कोटींचा आराखडा
तयार केला आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत दिली. (MLA Sunil Tingre)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वडगाव शेरीचे (Vadgaon Sheri Assembly Constituency) आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी महापालिकेत समाविष्ट 34 गावांमधील विकास कामांसंदर्भात उपस्थित लक्षवेधी मांडली होती. समाविष्ट गावांमध्ये पाणी, रस्ते, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था, उद्याने अशा पायाभूत सोयी-सुविधांची प्रचंड गैरसोय आहे. पालिकेत येऊनही गावांना विकासापासून वंचित रहावे लागत आहे. मतदारसंघातील लोहगाव गावातील समस्यांचा दाखला देत त्यांनी गावांसाठी महापालिकेकडे त्यासाठी पुरेसा निधी नाही. राज्य शासनाकडूनही मदत मिळत नाही. त्यामुळे या गावांच्या विकासासाठी अंदाजपत्रकात स्वतंत्र योजना करावी, राज्य शासनाने ही निधीची मदत करावी आणि सुविधा मिळेपर्यंत या गावांचा 50 टक्के कर माफ करावा अशी मागणी आमदार टिंगरे यांनी केली. तर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ही 34 गावांना किती निधी देण्यात आला, किती खर्च करण्यात आला आणि या गावांना प्रतिनिधीत्व देण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार अशी विचारणा केली.

या लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गावांमधील पाणी पुरवठा, मलनीत्सारण योजनांसाठी निधीची तरतूद केलेली आहे. याशिवाय इतर विकासकामासाठी अंदाजपत्रकात स्वतंत्र निधीची तरतुद करण्याबाबत महापालिका आयुक्तांना तशा सूचना दिलेल्या आहेत. या गावांवर निधीच्या बाबतीत अन्याय होणार नाही आणि मूलभूत सोयी-सुविधा देन्याचे काम केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच 23 गावांचा विकास आराखडा पीएमआरडीएच्या माध्यमातून अंतिम टप्यात आहे. दोन महिन्यांत त्यावर मंजुरीची कार्यवाही होऊन विकासकामांना सुरवात होईल असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले.

गावांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती –

मंत्री उदय सामंत (Uday Samant) या लक्षवेधीवर उत्तर देताना म्हणाले,
पुणे महापालिकेप्रमाणेच समाविष्ट 34 गावांचा समतोल विकास व्हावा यासाठी महापालिका आयुक्तांना
सूचना देण्यात येतील. तसेच विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल.
त्यात महापालिका आयुक्तांसह 34 गावांमधील लोकप्रतिनिधी असतील.
ही समिती या गावांमध्ये कोणती विकासकामे करायची यासंबंधीचा निर्णय घेऊन महापालिकेला तशी निधीची तरतूद करण्याची सूचना करतील असे सामंत यांनी स्पष्ट केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : MLA Sunil Tingre | The funds for the development of the
included villages will not be allowed to fall! Chief Minister’s assurance on the attention of MLA Sunil Tingre

हे देखील वाचा :

Pune PMC To FDA Administration | एफडीए ने अन्न परवाना नूतनीकरणावेळी व्यावसायीकांना पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) बंधनकारक करावे; महापालिका आयुक्तांचे FDA प्रशासनाला पत्र

Pune Traffic Updates News | शिवाजीनगर बस स्थानकाला लागून असलेला आकाशवाणी चौक ते दळवी हॉस्पिटल चौक रस्ता वाहतुकीसाठी खुला

Pune MahaVitaran News | आकुर्डीमध्ये महावितरणचा आकडेबहाद्दरांना दणका ! तब्बल चौदाशे वीजचोऱ्या उघड; नवीन वीजजोडणीसाठी रिघ

Related Posts