IMPIMP

Mumbai-Pune Expressway Accident | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून भीषण अपघात; 3 ठार

by nagesh
Mumbai-Pune Expressway Accident | gas tanker overturns on mumbai pune expressway 3 dead in accident

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai-Pune Expressway Accident | मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर (Propoline Gas Tanker) उलटून भीषण अपघात (Mumbai-Pune Expressway Accident) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यु (Died) झाला आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर उलटल्याने दोन्ही बाजुची वाहतूक थांबविण्यात आली आहे. आज (सोमवार) दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता. खोपोली एक्झिट (Khopoli Exit) जवळ उतारावर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर पुणे लेनवर येऊन उलटला. यावेळी टँकरला गाड्या धडकल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात गॅस टँकरचा चालक (Gas Tanker Driver) देखील गंभीर जखमी (Seriously injured) झाला आहे. त्याला पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Mumbai-Pune Expressway Accident)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महामार्गावरील दोन कार या क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आल्या आहेत. खोपोली अग्निशमन विभागाच्या मदतीने टँकर महामार्गावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. सध्या टँकर उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खबरदारी म्हणून खोपोली अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज असून खोपोली पोलीस स्टेशनचे (Khopoli Police Station) पोलीस निरीक्षक शिरीष पवार (PI Shirish Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे.

 

Web Title :- Mumbai-Pune Expressway Accident | gas tanker overturns on mumbai pune expressway 3 dead in accident

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या, मृतदेह झाडाला कुजलेल्या अवस्थेत आढळला; पुण्यातील धक्कादायक घटना

Liver Failure Warning Signs | ‘हे’ 5 संकेत दर्शवितात की तुमचं यकृत व्यवस्थितरित्या काम नाही करत, अजिबात दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या

Lung Cure | फुफ्फुसाच्या समस्येचा सामना करत असाल तर वाढू शकतो कार्डियक अरेस्टचा (Cardiac Arrest) धोका; ‘या’ 5 पध्दतीनं बाळगा सावधगिरी, जाणून घ्या

 

Related Posts