IMPIMP

Lung Cure | फुफ्फुसाच्या समस्येचा सामना करत असाल तर वाढू शकतो कार्डियक अरेस्टचा (Cardiac Arrest) धोका; ‘या’ 5 पध्दतीनं बाळगा सावधगिरी, जाणून घ्या

by nagesh
Lung Cure | lower lung function linked to risk of sudden cardiac death

सरकारसत्ता ऑनलाइन – Lung Cure | साधारणतः 50 किंवा 60 वर्षानंतर एखाद्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊ शकतो असे मानले जाते, परंतु अलीकडच्या काळात ज्याप्रकारे 30 ते 40 वयोगटातील व्यक्तींना सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्याच्या बातम्या येत आहेत, ते चिंताजनक आहे (Sudden Cardiac Arrest). आकडेवारी दर्शवते की जगभरातील तरुण लोक अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मरत आहेत. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या हृदयात कोणत्याही प्रकारचा त्रास असल्याची चिन्हे दिसत नाहीत (Lung Cure).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोणतीही लक्षणे नसताना हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाशी संबंधित कोणतीही तक्रार नसताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू का होतो, अशी भीती डॉक्टरांना सतावत आहे. आता या संदर्भातील संशोधन युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये मांडण्यात आले आहे (Lung Cure).

 

या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की तरुणांमध्ये फुफ्फुस निकामी (Lung Failure) होण्याचा थेट संबंध अचानक हृदयविकाराच्या मृत्यूशी आहे. म्हणजेच तरुणांची फुफ्फुसे नीट काम करत नसतील तर अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. (Lower Lung Function)

 

स्वीडनमधील एका विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने अशा 28,584 लोकांचा अभ्यास केला. हे सर्व 20 ते 45 वयोगटातील होते. या लोकांमध्ये आधीपासून हृदयाशी संबंधित आजाराची लक्षणे नव्हती. संशोधकांनी 40 वर्षे या लोकांवर लक्ष ठेवले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संशोधनाअंती असे आढळून आले की ज्या लोकांची फुफ्फुसे नीट काम करत (Lung Disease) नाहीत त्यांना अचानक मृत्यूचा धोका जास्त असतो. मध्यमवयीन लोकांमध्येही मृत्यूचा धोका 23 टक्क्यांपर्यंत होता. दुसरीकडे, जेव्हा हे लोक मोठे झाले, तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यातील मृत्यूची भीती पूर्वीच्या तुलनेत कमी झाली. वाढत्या वयानुसार, अशा लोकांमध्ये मृत्यूचा धोका 8 टक्क्यांनी कमी झाला.

 

मृत्यूची शक्यता कशी कमी करावी (How To Reduce The Chances Of Death)
फुफ्फुसाच्या कार्याचा आणि हृदयाच्या आरोग्याचा थेट संबंध असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे,
पण आजतागायत तरुणांमध्ये फुफ्फुसे कमकुवत झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका का येत आहे,
याचे मुख्य कारण काय आहे, याचा कोणताही भक्कम पुरावा नाही, त्यामुळे संशोधकांनी म्हटले आहे की,
30-35 वर्षापासून लोकांनी नियमित हृदय आणि फुफ्फुसाची तपासणी करून घेणे चांगले ठरेल.
जर फुफ्फुसाचे कार्य बरोबर नसेल, तर डॉक्टर काही खबरदारी घेण्याचा सल्ला देऊ शकतात.

 

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठीही अशी घ्या खबरदारी (Take Such Precautions For Good Heart Health)

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-3, फायबर आणि मिनरल्सचा आहारात समावेश करा. तळलेले आणि मसालेदार अन्न टाळा.

दिवसातून अर्धा तास व्यायाम करा. जॉगिंग, सायकलिंग आणि चालणे देखील करता येते.

लठ्ठपणावर नियंत्रण ठेवा आणि शरीर सक्रिय ठेवा.

रक्तदाब नियंत्रणात ठेवा. हाय ब्लड शुगरमुळे रक्तवाहिन्यांचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होऊ शकते.

सिगारेट आणि दारूपासून दूर राहा, हृदयाचे आरोग्य चांगले राहील.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Lung Cure | lower lung function linked to risk of sudden cardiac death

 

हे देखील वाचा :

Excessive Sweating | खुपच जास्त घाम येण्याची असेल समस्या तर ‘या’ पद्धतींनी करा दूर; जाणून घ्या

Best Multibagger Stock | ‘या’ कंपनीच्या शेअरची कमाल, 15 दिवसात पैसे केले डबल

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर निशाणा; म्हणाले – ‘मी मुंबईचा मराठी माणूस, हे शहर आमच्या बापाचं’

 

Related Posts