IMPIMP

Mumbai-Pune Pragati Express | प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस व्हिस्टाडोम कोचसह धावणार

by nagesh
Mumbai-Pune Pragati Express | mumbai pune pragati express to resume services with vistadom coch

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai-Pune Pragati Express | कोरोनाच्या महामारीत टाळेबंदीच्या काळात मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस (Mumbai-Pune Pragati Express) रद्द करण्यात आली होती. ती आता व्हिस्टाडोम कोचसह धावणार आहे. प्रगती एक्स्प्रेस ही डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेसनंतर मुंबई-पुणे मार्गावरील तिसरी रेल्वे आहे, जी व्हिस्टाडोम कोचसह धावणार आहे. या कोचमुळे प्रवाशांना निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.

 

ही एक्सप्रेस चौथी सीआर नेटवर्कवर आहे, कारण मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस देखील धावते. मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसमध्ये (Mumbai-Pune Pragati Express), व्हिस्टाडोम कोचमध्ये 180-डिग्री फिरता येण्याजोग्या आलिशान जागा, मोठ्या काचेच्या खिडक्या, अँटी-ग्लेअर स्क्रीनसह काचेचे छप्पर आणि प्रवाशांना अधिक माहिती देण्यासाठी वाय-फाय (Wi-Fi) आधारित प्रणाली आहे. ही गाडी 25 जुलैपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, प्रगती एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी 7.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मुंबईत सकाळी 11.25 वाजता पोहोचेल,
तर परतीच्या प्रवासासाठी ती सीएसएमटीहून संध्याकाळी 4.25 वाजता सुटेल आणि पुण्याला संध्याकाळी 7.50 वाजता पोहोचेल.
25 जुलैपासून संध्याकाळी 4.30 वाजता ही ट्रेन सुटेल आणि पुण्यात संध्याकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.
ही एक्स्प्रेस दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, शिवाजी नगर येथे थांबेल.
या गाडीचे आरक्षण आजपासून सुरू झाले असल्याची माहिती मध्य रेल्वेने (Central Railway) दिली.

 

Web Title :- Mumbai-Pune Pragati Express | mumbai pune pragati express to resume services with vistadom coch

 

हे देखील वाचा :

OBC Political Reservation Maharashtra | ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार?; सुप्रीम कोर्टात आज फैसला

Shivsena MP Revolt | शिवसेनेच्या 12 खासदारांचा CM एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील राजकीय पेचावर आज ‘सुप्रीम’ सुनावणी; आमदार अपात्रता याचिकेवर काय होणार? निर्णयाकडे लक्ष

 

Related Posts