Mundhwa Premier League Cricket Tournament | ‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Mundhwa Premier League Cricket Tournament | ईन्होव्हेटीव प्रेसेंट्स एम पी एल कमीटी तर्फे आयोजित ‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धेत महाराणा रॉयल्स् संघाने एसआरके रायडर्स संघाचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
मुंढवा येथील चंचलाताई क्रिडा संकूल मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सतिश दुबे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर महाराणा रॉयल्स् संघाने एसआरके रायडर्स संघाचा २३ धावांनी पराभव करून विजेतेपदावर आपल्या संघाचे नाव कोरले. पहिल्यांदा फलंदाजी करताना महाराणा रॉयल्स् संघाने ७० धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये सतिश दुबे याने २७ धावा तर, विशाल सरकार याने २४ धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना एसआरके रायडर्स संघाचा डाव ४७ धावांवर मर्यादित राहीला. सद्दाम कुरेशी (नाबाद १५ धावा) आणि प्रश्न भंडारी (१५ धावा) यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही. सतिश दुबे याने (२-१२) अचूक गोलंदाजी करत विजयाच मोलाचा वाटा उचलला. (Mundhwa Premier League Cricket Tournament)
स्पर्धेचे पारितोषिक वितरण किशोर धायरकर, रविंद्र कोद्रे, संदिप लोणकर, धैर्यशील गायकवाड, तेजस कोद्रे,सोमनाथ गायकवाड,भंडारी ब्रदर्स, अजय जाधव, देवेंद्र भाट , केतुल शिंदे यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेमध्ये विजेता महाराणा रॉयल्स्, उपविजेता एसआरके रायडर्स, भंडारी ब्रदर्स, तन्नई वॉरीयर्स, लक्ष्मी विनर्स, धैर्यशील सनरायझर्स, सीएसके थलाईवाझ् आणि मोतोश्री फायटर्स हे आठ संघ सहभागी झाले होते. ५ दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण १३० खेळाडूंनी भाग घेतला होता.
विजेत्या महाराणा रॉयल्स् संघाला करंडक आणि १ लाख २५ हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान संतोष गायकवाड (भंडारी ब्रदर्स, २०७ धावा) आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजचा मान मुजाहीद शेख (एसआरके रायडर्स, १३ विकेट) यांना देण्यात आला. सर्वांचे आभार संदिप दादा कोद्रे यांनी मानले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः
महाराणा रॉयल्स्ः ६ षटकात ३ गडी बाद ७० धावा (सतिश दुबे २७, विशाल सरकार २४, अजिंक्य भैरामडगीकर १-११)
वि.वि. एसआरके रायडर्सः ६ षटकात २ गडी बाद ४७ धावा (सद्दाम कुरेशी नाबाद १५, प्रश्न भंडारी १५, सतिश दुबे
२-१२); सामनावीरः सतिश दुबे;
Web Title :- Mundhwa Premier League Cricket Tournament | Mundhwa Premier League Cricket Tournament Maharana Royals won the title
Maharashtra Politics | ‘2013 आणि 2018 साली शिवसेनेत लोकशाही पद्धतीने…’, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर पलवार
Pune Pimpri Chinchwad Crime | स्कोडा कारमधून पिस्टलची चोरी, निगडी परिसरातील घटना
Pune News | डिजिटल भारत सक्षम होत असताना पुण्यातील डिजिटल मिडियाला वार्तांकनास पासेस नाकारले
Comments are closed.