IMPIMP

Nana Patekar | ‘हे फक्त नितीन गडकरीच करू शकतात’ – नाना पाटेकर

by nagesh
Nana Patekar | nana patekar tell incident of nitin gadkari about congress leader program in nagpur

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन   खासदार (संसद) सांस्कृतिक महोत्सव 2022 च्या उद्घघाटन समारंभात नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले. काँग्रेसचा नेता असूनही नितीन गडकरींनी मला रणजीत देशमुखांच्या कार्यक्रमाला जाण्यास सांगितले. हे फक्त गडकरीच करू शकतात, असे नाना पाटेकर (Nana Patekar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाना म्हणाले, मला या कार्यक्रमाला यायला उशीर झाला. कारण, मी रणजीत देशमुख यांच्या वडिलांच्या पुतळ्याचे अनावरण होते, त्या कार्यक्रमाला गेलो होतो. नितीन गडकरी यांनीच मला तिकडे जाण्यास सांगितले. संध्याकाळी जेव्हा मी थकल्या भागल्यावर घरी येतो. तेव्हा मला काहीतरी आनंद हवा असतो. त्यासाठी गप्पा मारायच्या असतात. आनंदाची व्याख्या माणसागणिक बदलत जाईल. खरे सांगतो इतक्या वर्षांनंतर इतक्या हिरिरीने विचार करणारा माणूस म्हणजे नितीन गडकरी. गडकरींनी सांस्कृतिक महोत्सव या माध्यमाची ताकद बरोबर ओळखली आहे. हे माध्यम म्हणजे केवळ करमणूक नाही. इथे सगळ्या जाती-धर्माची माणसे एकत्र येतात. हा एक सूक्ष्म राजकारणाचाच भाग आहे. सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद झाला पाहिजे.

 

Web Title :- Nana Patekar | nana patekar tell incident of nitin gadkari about congress leader program in nagpur

 

हे देखील वाचा :

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आता थेट संवाद साधा

TikTok Star Megha Thakur | टिक टॉक स्टार मेघा ठाकूरचं 21 व्या वर्षी निधन

Mumbai Crime | खारमध्ये डिलिव्हरी बॉयने घरात घुसत केला महिलेचा विनयभंग

 

Related Posts