IMPIMP

TikTok Star Megha Thakur | टिक टॉक स्टार मेघा ठाकूरचं 21 व्या वर्षी निधन

by nagesh
TikTok Star Megha Thakur | tiktok star megha thakur died age of 21 in canada her parents shared post on instagram

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – TikTok Star Megha Thakur | कलाविश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅनडातील प्रसिद्ध टिक टॉक स्टार मेघा ठाकूरचं 21 व्या वर्षी निधन झाले. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून मेघाच्या पालकांनी तिच्या निधनाची बातमी शेअर केली आहे. टिक टॉकवर मेघा ठाकूरचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. मेघाचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (TikTok Star Megha Thakur)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मेघाच्या पालकांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, आमच्या आयुष्यातील एक दिवा, काळजी घेणारी सुंदर मुलगी मेघा ठाकूरचं 24 नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास निधन झालं. मेघा एक स्वतंत्र आणि स्वत:वर आत्मविश्वास ठेवणारी तरुण मुलगी होती. आम्ही तिला मिस करू. मेघा तिच्या चाहत्यांवर खूप प्रेम करायची. मेघावर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम ठेवा. तुमच्या प्रार्थनेतून तिला एक नवीन प्रवासाचा मार्ग सापडेल, अशाप्रकारे मेघाच्या आठवणींना उजाळा देत तिच्या पालकांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली.

 

 

मेघा एक वर्षाची असताना तिचे पालक कॅनडामध्ये शिफ्ट झाले होते.
2019 मध्ये माध्यमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर मेघाने पाश्चिमात्य विद्यापीठात प्रवेश घेतला.
यानंतर तिने टिक टॉकवर पदार्पण केले आणि ती अगदी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात फेमस झाली.
तिच्या फॉलोवर्सची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आणि ती एक टिक टॉक स्टार बनली.
तिच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांकडून तिला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- TikTok Star Megha Thakur | tiktok star megha thakur died age of 21 in canada her parents shared post on instagram

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | व्हॉट्सअ‍ॅपपवरील लिंक ओपन करणं तरुणाला पडले महागात, सायबर चोरट्यांनी घातला अडीच लाखांचा गंडा

Shinde Fadnavis Govt | उच्च न्यायालयाचा शिंदे फडणवीस सरकारला दणका; ‘या’ निर्णयाला दिली स्थगिती

PCMC Recruitment | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक पदांसाठी मेगा भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी

 

Related Posts