IMPIMP

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आता थेट संवाद साधा

by nagesh
PM Narendra Modi | pariksha pe charcha 2023 pm modi will give answers to your questions register now

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   येत्या वर्षात म्हणजे 2023 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ असे या कार्यक्रमाचे नाव असून, यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट mygov.in द्वारे अर्ज करता येणार आहेत. ही प्रक्रिया 30 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते. यासंदर्भात शिक्षण मंत्रालयाने ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे पुढील वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे.

 

(pariksha pe charcha) परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत परीक्षेवर गप्पा मारण्यात येणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षांची भीती वाटू नये म्हणून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे मुलांचे मनोबल वाढणार आहे. मुलांना परीक्षांची तयारी करण्यास मदत होणार आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी 9 वी ते 12 वीपर्यंतचे सर्व विद्यार्थी नोंदणी करू शकतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

परीक्षा पे चर्चाच्या नोंदणीसाठी प्रथम innovateindia.mygov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करता येणार आहे.
येथे मुख्यपृष्ठावर, ‘PPC 2022’ साठी लिंकवर क्लिक करून, पार्टिसिपेट नाऊवर क्लिक करायचे आहे.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यापैकी कोणत्याही एका लॉगिनवर क्लिक करून सभासद होता येणार आहे.
(PM Narendra Modi)

 

2018 पासून परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात सामील होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस
वाढतच आहे. गेल्या वर्षी 1 एप्रिल रोजी हा कार्यक्रम झाला होता. यावेळी 15 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि
पालक सहभागी झाले होते. यात 12 लाख विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 

 

Web Title :- PM Narendra Modi | pariksha pe charcha 2023 pm modi will give answers to your questions register now

 

हे देखील वाचा :

TikTok Star Megha Thakur | टिक टॉक स्टार मेघा ठाकूरचं 21 व्या वर्षी निधन

Pune Pimpri Crime | व्हॉट्सअ‍ॅपपवरील लिंक ओपन करणं तरुणाला पडले महागात, सायबर चोरट्यांनी घातला अडीच लाखांचा गंडा

Shinde Fadnavis Govt | उच्च न्यायालयाचा शिंदे फडणवीस सरकारला दणका; ‘या’ निर्णयाला दिली स्थगिती

PCMC Recruitment | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक पदांसाठी मेगा भरती; पदवीधरांना सुवर्णसंधी

 

Related Posts