IMPIMP

Nana Patole | श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी

by nagesh
Nana Patole | if mahavikas aaghadi breaks congress plan is ready said nana patole

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात (Maharashtra Bhushan Award) 14 श्री सदस्यांचा मृत्यू
(Shree Sevak Death) झाला आहे. सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे ही घटना घडली आहे. तसेच प्रसार माध्यमांमध्ये येत
असलेले वृत्त पाहता हे मृत्यू उष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने झाले असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर सखोल चर्चा होणे गरजेचे असल्याचे नाना पटोले
(Nana Patole) यांनी म्हटले आहे. तसेच सदोष मनुष्यवधाच्या या घटनेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन (Legislature Special
Session) बोलवावे, अशी मागणी नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांना पत्र लिहून केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हटलंय पत्रात?
नवी मुंबईतील खारघर येथे 16 एप्रिल रोजी झालेल्या 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर व मनाला वेदना देणारी आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. Appasaheb Dharmadhikari) यांच्यावर प्रेम करणारे जवळपास 20 लाख श्रीसदस्य राज्यभरातून या कार्य़क्रमासाठी आले होते. हा सोहळा राज्य सरकारने (State Government) आयोजित केला होता. यासाठी तब्बल तेरा कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केले गेले. एवढा खर्च करुनही श्रीसदस्यांसाठी तंबूही बांधण्यात आला नाही, त्यांना कडक उन्हात तासन तास बसावे लागले, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रात नमूद केले आहे.

 

 

उष्माघात की चेंगराचेंगरी?
या कार्य़क्रमासाठी आलेल्यांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही आणि उष्माघाताने (Kharghar Heat Stroke Case) अनेक श्रीसदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील आणखी धक्कादाय बाब म्हणजे उष्माघाताबरोबर चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून येत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सरकारला या कार्य़क्रमाचे योग्य नियोजन करता आले नाही. ढिसाळ नियोजनामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आणि 500 पेक्षा जास्त श्रीसदस्य उपचार घेत आहेत. हा आकडा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती नाना पटोलेंनी व्यक्त केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच कार्य़क्रमाची वेळ दिली होती असे सांगत सरकारकडून आता त्यांनाच दोषी ठरवले जात आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारने केले होते. त्यामुळे 14 मृत्यूंची जबाबदारी आयोजक या नात्याने त्यांना नाकारता येणार नाही. या घटनेप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी मागणी आम्ही याआधीच केली आहे, असे पत्रात म्हटले आहे.

 

Web Title :- Nana Patole | Congress leader nana patole write letter to governor ramesh bais after kharghar incident

 

हे देखील वाचा :

Congress Mohan Joshi | कसब्यातील काँग्रेसच्या विजयामुळेच झुकला भाजप; काँग्रेसचे नेते मोहन जोशी म्हणाले – ‘प्रभू श्रीराम त्यांच्या नाही तर आमच्याच बरोबर’

Non-Creamy Layer Certificate | खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Maharashtra Cabinet Decisions | महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठक निर्णय : जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

 

Related Posts