IMPIMP

Nana Patole | खोटारडेपणा अन् चेष्टा हाच भाजपचा खरा चेहरा – नाना पटोले

by nagesh
Nana Patole On Shinde-Fadnavis Govt | 'Started immediately in ministry for fear of government collapse'; Indicative statements of nana patole

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्यात राजकारणाला उत आला आहे. अधिवेशनाचा आज (दि. 21) तिसरा दिवस आहे. पहिले दोन दिवस कर्नाटक सीमाप्रश्नावरून आणि नागपूर एनआयटी कथित भूखंड गैरव्यवहारावरून विधानसभा गाजली. आजच्या कामकाजात मराठवाडा आणि विदर्भाच्या प्रश्नांवर वादळी चर्चा होणार आहे. विरोधकांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. आजच्या अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले. खोटारडेपणा आणि चेष्टा, हा भाजपचा खरा चेहरा आहे, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

2014 ते 2019 या काळात राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार होते. त्यावेळी त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यासाठी काय केले? त्यांच्याकडे सांगण्यासाठी देखील काही नाही. त्याचमुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कामाची चर्चा करण्याचा प्रस्ताव शिंदे सरकार विधीमंडळात मांडण्याच्या तयारीत आहे. आम्ही त्यांचेच पितळ उघडे करू. खोटारडेपणा आणि चेष्टा हा भाजपचा खरा चेहरा आहे. हे विदर्भाच्या जनतेला कळाले आहे. नरेंद्र मोदींनी कोरोना काळात लावलेले निर्बंध आणि जनतेला झालेला त्रास भाजप विसरली असून, त्यांच्यासारखे वाईट मानसिकतेचे लोक देशात दुसरीकडे सापडणार नाहीत, असे पटोले (Nana Patole) म्हणाले.

 

आज कर्नाटक सरकार देखील महाराष्ट्राला एक इंचही जागा न देण्याचा प्रस्ताव त्यांच्या विधानसभेत मांडणार आहे.
मात्र, जे आमचे आहे, ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही.
केंद्राच्या आशीर्वादाने कर्नाटक महाराष्ट्रावर दबाव आणत आहे.
गुजरात निवडणुकीच्या आधी देखील केंद्राने राज्यातील उद्योग गुजरातला पळवून महाराष्ट्राला बरबाद करण्याचे काम केले होते. केंद्रातील मोदी सरकारचा हा प्रकार महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही, असेही यावेळी पटोलेंनी नमूद केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nana Patole | nana patole criticized bjp and shinde government on issue vidarbha issue

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | ‘मी फक्त एकाच व्यक्तीला घाबरते, त्या म्हणजे…’ – अमृता फडणवीस

MP Sanjay Raut | संजय राऊतांच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली, म्हणाले-‘संजय राऊत हा…’

Amruta Fadnavis | ‘म्हणून मी आदित्य ठाकरेंना रेशमी किडा म्हणाले’ – अमृता फडणवीस

 

Related Posts