IMPIMP

Amruta Fadnavis | ‘म्हणून मी आदित्य ठाकरेंना रेशमी किडा म्हणाले’ – अमृता फडणवीस

by nagesh
 Amruta Fadnavis | amruta fadnavis files fir against designer Aniksha alleges threat conspiracy and offering rs 1 crore

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना स्त्री अत्याचारी आणि प्रतिगामी म्हटले होते. त्यामुळे मला संताप आला. माझा तिळपापड झाला होता आणि म्हणूनच मी त्यांना रेशमाचा किडा असे म्हटले होते, असे स्पष्टीकरण अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी दिले आहे. देवेंद्रजी अथक परिश्रमातून वर आले आहेत, तर आदित्य ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेमुळे आहेत, असे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खासगी टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तारातूंन टीका केली जात होती.

 

अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या अभिरूप न्यायालय कार्यक्रमात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) बोलत होत्या. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. माझ्या काही विधानांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांपर्यंत तक्रारी गेल्या होत्या. माझ्या काही वक्तव्यांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आल्याचे वृत्त खरे आहे, पण तक्रार करणारे हे स्वत:च्या घरातील स्त्रियांबद्दल उदासीन आहेत, असे फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमृता फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. त्या विविध विधाने करून चर्चेत असतात.
महाविकास आघाडीवर देखील त्या अनेक वेळा टीका करतात.
त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्या होत्या.
त्यावर त्यांनी या कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले आहे.

 

Web Title :- Amruta Fadnavis | amruta fadnavis explains about why she called aditya thackeray as silk worm uddhav as bhogi

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | संजय राऊतांच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली, म्हणाले-‘संजय राऊत हा…’

Maharashtra Gram Panchayat Result | गुराखी बनला सरपंच, वर्गणी काढून लढवली निवडणूक, भाजपा-काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव

Pune Crime | काजूकतली फुकट न दिल्याने गोळीबार; सिंहगड रोडवरील मिठाईच्या दुकानातील घटना

Winter Session 2022 | भुखंड घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी मागितला मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा…

 

Related Posts