IMPIMP

Nandurbar Police | शेणखाताच्या गाडीतून देशी-विदेशी दारुची वाहतूक, नंदुरबार पोलिसांकडून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

नंदूरबार : सरकारसत्ता ऑनलाइनNandurbar Police | ट्रॅक्टरमध्ये शेणखतात लपवून बेकायदेशीर विदेशी दारुची (Foreign Liquor) चोरटी वाहतूक (Illegal Smuggling) करणाऱ्यावर नंदुरबार पोलिसांच्या (Nandurbar Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाई केली. या कारवाईत (Nandurbar  Crime) पोलिसांनी देशी-विदेशी दारुसह 16 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.14) रात्री शहादा तालुक्यातील मंदाना (Mandana Shahada Taluka) या ठिकाणी करण्यात आली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र (Deputy Inspector General of Police, Nashik Range) यांच्या आदेशान्वये संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारु तस्करांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश नंदुरबार पोलिसांना (Nandurbar Police) देण्यात आले होते. याच दरम्यान पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांना माहिती मिळाली की, 14 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री शहादा तालुक्यातील मंदाना गावाकडून एक लाल रंगाच्या ट्रॅक्टर मध्ये शेणखत भरलेले असून त्याखाली देशी-विदेशी दारुचे खोके ठेवून अवैध दारुची चोरटी वाहतूक केली जाणार आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (LCB Police Inspector Ravindra Kalamkar) यांना माहिती देऊन तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

 

त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी एक पथक तयार केले. पथकाने पिपडे गावाच्या पुढे रस्त्यावर सापळा रचला.
रात्री 12.45 वाजता असलोद (Aslod) गावाकडून पिपडे गावाकडे एक लाल रंगाचा ट्रॅक्टर येताना दिसला.
पथकातील पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवला. ट्रॅक्टरची पाहणी केली त्यावेळी शेणखात्याच्या खाली देशी विदेशी दारुचे बॉक्स आढळून आले.
पोलिसांनी ट्रॅक्टर चालक लखन उर्फ गणेश दला भिल Lakhan alias Ganesh Dala Bhil (वय-28 रा. वाडी बुद्रुक ता. शिरपुर जि. धुळे)
याला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता हा माल बोराडी येथील पिंटु पाटील (Pintu Patil)
याच्याकडून घेऊन अक्कलकुवा (Akkalkuwa) गावाच्या पुढे 2 ते 3 किमीवर सोडण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी या कारवाईत 6 लाख 86 हजार 400 रुपये किमतीची बॉम्बे व्हिस्कीच्या (Bombay Whiskey) 180ML एकूण 110 बॉक्स
त्यामध्ये 5280 सिलबंद काचेच्या बाटल्या. 1 लाख 68 हजार 480 रुपये किमतीची किंगफिशर स्ट्रॉंग बियरचे (Kingfisher Strong Beer) 500ML चे
39 बॉक्स त्यामध्ये 936 बिअरचे टीन, 55 हजार 200 रुपये किंमतीची माउन्ट 6000 सुपर स्ट्रॉंग बियरचे (Mount 6000 Super Strong Beer) 500 ML चे
20 बॉक्स, 7 लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर असा एकूण 16 लाख 10 हजार 80 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहादा पोलीस ठाण्यात (Shahada Police Station) गुन्हा दाखल करुन आरोपीला शहदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार दिपक गोरे,
पोलीस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, पोलीस शिपाई विजय ढिवरे यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Nandurbar Police | Nandurbar police Rs 16 lakh worth of liquor case

 

हे देखील वाचा :

Nandurbar Police | मौजमजेसाठी विद्यार्थ्यांनी चोरले आश्रमशाळेतील लॅपटॉप; नंदुरबार पोलिसांकडून 48 तासात गुन्हा उघडकीस, 22 लॅपटॉप जप्त

Pune Crime | ‘माझ्यावर 307 केली होती ना, आता विकेट काढतो’ ! सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर कोयत्याने वार, बोपोडीतील घटना

ST Workers Strike | संपामुळे ST सेवा ठप्प ! महामंडळाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

Related Posts