IMPIMP

Pune Crime | ‘माझ्यावर 307 केली होती ना, आता विकेट काढतो’ ! सराईत गुन्हेगाराकडून तरुणावर कोयत्याने वार, बोपोडीतील घटना

by nagesh
Pune Crime | A senior citizen was stabbed and his mobile taken away; Morning incident at Kharadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | ‘‘तुझ्यामुळे मी ३ महिने जेलध्ये गेलो, तु माझ्यावर ३०७ केली होती. आता तुझी मस्ती काढतो. आज तुझी विकेट काढतो, ’’असे म्हणून (Pune Crime) एका सराईत गुन्हेगाराने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. खडकी पोलिसांनी (Khadki police) त्याच्यावर दुसर्‍यांदा खूनाचा प्रयत्न (कलम ३०७) केल्याचा गुन्हा दाखल (FIR) केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रोहित गद्रे (Rohit Gadre) (रा. दापोडी) व त्याचे दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिषेक तुकाराम मोरे (Abhishek Tukaram More) (वय ३०, रा. बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना बोपोडीतील शिवाजी गार्डन येथील गंगाम्मा चायनीजजवळ सोमवारी रात्री अकरा वाजता (Pune Crime) घडली.

 

फिर्यादी व त्यांचा मित्र निखिल गायकवाड (Nikhil Gaikwad) हे शिवाजी गार्डन (Shivaji Garden) येथील गंगाम्मा चायनिजजवळ गेले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा रोहीत गद्रे हा त्याच्या दोन साथीदारांसह तेथे आला. तो फिर्यादीला म्हणाला की, ‘‘माझ्याकडे काय बघतो. तुझ्यामुळे मी तीन महिने जेलमध्ये गेलो. तू माझ्यावर ३०७ केली होती ना. तुला मस्ती आली आहे ना. तुझी मस्ती काढतो. आज तुझी विकेट काढतो,’’ असे बोलून त्याने कोयत्याने (Sickle) फिर्यादीच्या डोक्यात वार केला. सुदैवाने फिर्यादीने डावा हात मध्ये घातल्यामुळे कोयत्याने डाव्या हाताला जखम झाली.

 

इतर आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. कोयते हवेत फिरवून मोठ मोठ्याने ओरडून दहशत निर्माण केली.
त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक भाबड (API Bhabad) तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Young man stabbed by a criminal in Bopodi khadki Police Station Limits

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | संपामुळे ST सेवा ठप्प ! महामंडळाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Crime | ‘गणेश पेठेचा भाई आहे’ म्हणत तडीपार गुन्हेगाराचा ‘राडा’; भर रस्त्यात महिलेचा विनयभंग करुन पसरविली दहशत

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण; जाणून घ्या आजचा भाव

 

Related Posts