IMPIMP

National Flag | अभिमान दिन ! गांधी जयंतीनिमित्त लेहमध्ये जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे अनावरण, मुंबईतील कंपनीने बनवला ‘ध्वज’

by nagesh
National Flag | world s largest khadi national flag installed in leh town on mahatma gandhi birth anniversary

नवी दिल्ली : वृत्तसंस्था National Flag | देशभरात महात्मा गांधी यांची 152 वी जयंती (Mahatma Gandhi Birth Anniversary) साजरी केली जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त जगातील सर्वात मोठा खादीचा राष्ट्रीय ध्वज लेहमध्ये (World Largest Khadi National Flag in Leh, Ladakh) लावण्यात आला. लडाखचे उपराज्यपाल आर.के. माथुर यांनी शनिवारी केंद्रशासित प्रदेशात खादीच्या कपड्याने बनवलेल्या तिरंग्याचे अनावरण केले. या दरम्यान लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे आणि लष्कराचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

मुंबईतील कंपनीने बनवला ध्वज
देशातील केंद्रशासित प्रदेश लडाखची राजधानी लेहच्या जनस्कार पर्वतावर हा तिरंगा (National Flag) लावण्यात आला आहे. या ध्वजाची लांबी 225 फुट आणि रूंदी 150 फुट आणि वजन 1000 किलोग्रॅम आहे. हा तिरंगा मुंबईतील एका प्रिंटींग कंपनीने तयार केला आहे.

 

 

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया (health minister mansukh mandaviya) यांनी ध्वज अनावरण भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. मंडाविया यांनी ट्विट करत लिहिले की, गांधी जयंतीला लडाखच्या लेहमध्ये जगातील सर्वात मोठ्या तिरंग्याचे अनावरण झाले. मी या भावनेला सलाम करतो, जी बापूजींची स्मृती जागवते, भारतीय कारागिरांना प्रोत्साहन देते आणि राष्ट्राचा सन्मान करते.

 

 

70 कारागिरांना लागले 49 दिवस
हा तिरंगा तयार करण्यासाठी सुमारे 4500 मीटर खादीच्या कपड्याचा वापर करण्यात आला. तिरंगा एकुण 37,500 वर्ग फुट परिसर कव्हर करतो. हा राष्ट्रीय ध्वज बनवण्यासाठी 70 कारागिरांना 49 दिवस लागले.

 

Web Title :- National Flag | world s largest khadi national flag installed in leh town on mahatma gandhi birth anniversary

 

हे देखील वाचा :

SIP | ‘या’ पध्दतीनं करा गुंतवणूक, तयार होईल 10.19 कोटींचा ‘फंड’; जाणून घ्या कसे करावे नियोजन?

Sanjay Raut | अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीवरून शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘राज्याच्या प्रश्नांवर बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही रीत कुठली?’

Digital Media संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर !

 

Related Posts