IMPIMP

Digital Media संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर !

sub heading : तात्याराव लहाने, प्यारेतात्याराव लहाने, प्यारे खान, CP अमितेशकुमार, डॉ. राजेश देशमुख, मातृभूमी, दिशा प्रतिष्ठान यांच्यासह राज्यातील 30 मान्यवरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 तारखेला मुंबईत गौरव खान, CP अमितेशकुमार, डॉ. राजेश देशमुख, मातृभूमी, दिशा प्रतिष्ठान यांच्यासह राज्यातील 30 मान्यवरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5 तारखेला मुंबईत गौरव

by nagesh
digital media editors and journalists association's Founder President Raja Mane announces Maharashtra's covid Yodha Award! Tatyarao Lahane, Pyare Khan, CP Amitesh Kumar, Dr. Rajesh Deshmukh, Mathrubhumi, Disha Pratishthan including with 30 dignitaries from the state honored at the hands of Deputy Chief Minister on 5th in Mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Digital Media | कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासुन राज्यात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ति, संस्था व अधिकार्‍यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन संघटनेच्या वतीने गौरव करण्यात येत आहे. राज्यातील पुरस्कारांची घोषणा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना (digital media editors and journalists association) महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने (Founder President Raja Mane) यांनी आज येथे केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

मंगळवार दि. ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत सह्याद्रि अतिथीगृह येथे सायंकाळी ४.०० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते ३० मान्यवरांना स्मृतिचिन्ह
व कृतज्ञतापत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण व संस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख (Amit Vilasrao Deshmukh),
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) आणि कृषि राज्य मंत्री डॉ. विश्वजित पतंगराव कदम (dr. vishwajeet patangrao kadam) हे उपस्थित राहणार आहेत.

 

पुरस्कार विजेत्यांची नावे अशी,

सामाजिक संस्था विभाग –

कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी, कोल्हापूर (जाफरबाबा सय्यद), मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी (संतोष ठोंबरे), भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य, पुणे (केतनभाई शहा, सोलापूर),
सेवांकूर, मुंबई (संयोजक डॉ.नितीन गायकवाड, औरंगाबाद), दिशा प्रतिष्ठान, लातूर (सोनू डागवाले), सिंधूमित्र सेवा-सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी, जि.सिंधूदुर्ग. (डॉ.प्रवीणकुमार ठाकरे),
वजीर रेस्क्यू फोर्स, शिरोळ, जि.कोल्हापूर (रौफ पटेल), मुस्लिम सत्यशोधक मंडळ, पुणे. (डॉ.शमसुद्दीन तांबोळी), वंदे मातरम्, पुणे (सचिन जामगे), हिंदवी परिवार महाराष्ट्र (डॉ.शिवरत्न शेटे).

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शासकीय अधिकारी व व्यक्ति विभाग –

पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, अमितेशकुमार (पोलिस आयुक्त,नागपुर), गणेश देशमुख (महापालिका आयुक्त, पनवेल) डॉ.प्रदीप आवटे (राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी),
डॉ.राजेंद्र भारुड (माजी जिल्हाधिकारी,नंदुरबार), डॉ.राजेश देशमुख (जिल्हाधिकारी, पुणे), मिलिंद शंभरकर (जिल्हाधिकारी, सोलापूर), प्यारे खान नागपूर,
डॉ.संजय अंधारे बार्शी, मंगेश चिवटे ठाणे, डॉ.महादेव नरके कोल्हापूर, मधुकर कांबळे परभणी, डॉ.बंडू वामनराव रामटेके (वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर),
डॉ ‌गौतम व मनिषा छाजेड पुणे, करण गायकवाड परभणी, डॉ.मुन्नालाल गुप्ता वर्धा, डॉ.नमिता आनंद सोनी औरंगाबाद, राजेश बाहेती दूबई-पुणे, प्राचार्य अजय कौल
(एकता मंच, अंधेरी, मुंबई), बाबासाहेब पिसोरे दौलावडगाव,ता. आष्टी, जि.बीड.

 

Web Title : digital media editors and journalists association’s Founder President Raja Mane announces Maharashtra’s covid Yodha Award! Tatyarao Lahane, Pyare Khan, CP Amitesh Kumar, Dr. Rajesh Deshmukh, Mathrubhumi, Disha Pratishthan including with 30 dignitaries from the state honored at the hands of Deputy Chief Minister on 5th in Mumbai

 

हे देखील वाचा :

Monsoon | ‘मान्सून’ परतीच्या प्रवासाला उशिरा सुरूवात; 1960 नंतरची ‘ही’ दुसरी वेळ

जर पसंत नसेल Aadhaar Card वरील फोटो तर ‘या’ सोप्या पद्धतीने बदलू शकता; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Jal Jeevan Mission | पीएम मोदी यांनी लाँच केले जलजीवन मिशन अ‍ॅप, पाणी समित्यांशी केली चर्चा

 

Related Posts