IMPIMP

Navneet Kaur Rana Vs Shivsena | नवनीत राणांना अडवण्यासाठी शिवसेनेची ‘खास’ फिल्डिंग; पहाटेपासून CSMT वर गर्दी

by nagesh
Amravati Love Jihad Case | serious allegations of a girl on navneet rana in amravati love jihad case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Navneet Kaur Rana Vs Shivsena | अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Kaur
Rana) यांनी शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानासमोर येत हनुमान चालिसा (Hanuman
Chalisa) पठण करणार असल्याचा ठाम निर्धार केला आहे. उद्या म्हणजेच त्या 23 एप्रिलला हनुमान चालिसा म्हणणार आहेत त्यामुळे त्या आज मुंबईत
दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही (Navneet Kaur Rana Vs Shivsena) आक्रमक पवित्रा घेतलेला दिसत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नवनीत राणा या विदर्भ एक्सप्रेसने (Vidarbha Express) मुंबईत येऊ शकतात ही शक्यता गृहीत धरून शिवसेनेचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (CSMT) पहाटे पोहोचले होते. एसएमटीच्या फलाट क्रमांकावर 18 वर पहाटेपासूनच शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. जेणेकरून राणा दाम्पत्य आले की त्यांना विरोध करता येईल मात्र विदर्भ एक्सप्रेस मुंबईत आली मात्र राणा दाम्पत्य त्यामध्ये आले नाही. (Navneet Kaur Rana Vs Shivsena)

 

 

नवनीत राणा कुठे येतील या सर्व शक्यतांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये फिल्डिंग लावलेली दिसली. मात्र या संघर्षामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता मुंबई पोलीस (Mumbai Police) काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

दरम्यान, हनुमान जयंती दिवशी अमरावतीमध्ये हनुमान चालिसा पठण केलं होतं. त्यादिवशीच त्यांनी शिवसेनेला आव्हान दिलं होतं.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मला वेळ, तारीख सांगावी त्या दिवशी ‘मातोश्री’वर (Matoshree)
जाऊन हनुमान चालिसेचं पठण करेल, असं नवनीत राणा यांनी म्हटलं होतं.

 

 

Web Title : Navneet Kaur Rana Vs Shivsena | shivsena workers gather on csmt railway station to stop mp navneet kaur rana from going on matoshree for hanuman chalisa

 

हे देखील वाचा :

Maharashtra Phone Tapping Case | फोन टॅपिंगप्रकरणात धक्कादायक खुलासा ! ‘एस. रहाटे’ आणि ‘खडासने’ या बोगस नावाचा वापर, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | चक्क मोबाईल टॉवर गेला चोरीला ! मॉडेल कॉलनी, पाषाणमधील मोबाईल टॉवर, जनरेटर बॅटरी बँकसह साहित्य चोरीला

Diets To Prevent Liver Disorders | यकृताचे विकार टाळण्यासाठी ‘हे’ पथ्ये पाळणे आवश्यक; जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts