IMPIMP

Nawab Malik First Reaction After ED Arrest | ‘लढेंगे और जितेंगे सबको एक्सपोस करेंगे’; अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया

by nagesh
Nawab Malik First Reaction After ED Arrest

सरकारसत्ता ऑनलाइन – Nawab Malik First Reaction After ED Arrest | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक (Arrested By ED) केली आहे. थोड्यावेळात त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ईडीने मलिक यांची  जवळपास आठ तास चौकशी केली. नवाब मलिक यांनी त्यांना ताब्यात घेतल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Nawab Malik First Reaction After ED Arrest)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रूकेंगे नही लढेंगे और जितेंगे अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. नवाब मलिक यांनी ईडीच्या (ED) बाहेर आल्यावर विक्टरी साईन दाखवली. नवाब मलिक यांना आचा कोर्टात हजर करायचं आहे. त्याआधी त्यांची जे. जे. रूग्णालयात मेडिकल चाचणी होणार आहे. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) अटकेनंतर भाजपवर टीका केली आहे.

 

नवाब मलिक यांच्यावर काही आरोप (Allegations) लावण्यात आले आहेत. त्यातील एक म्हणजे, मलिकांचे अंडरवर्ल्डसोबत (Underworld) जवळचे संबंध आहेत, मलिकांनी अंडरवर्ल्डमधील लोकांसोबत आर्थिक व्यवहार असं ईडीने म्हटलं आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना सुनावणीवेळी कोणती कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ईडी कोठडी मिळाली तर त्यांना कायदेशीर आव्हान करण्याचा अधिकार आहे.

 

दरम्यान, नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती समजत आहे.

 

Web Title :- Nawab Malik First Reaction After ED Arrest

 

हे देखील वाचा :

Eating With Empty Stomach | सकाळी रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नका ‘या’ 6 गोष्टी, आरोग्यासाठी आहेत धोकादायक; पडू शकते महागात

Pune Crime | सराईत गुन्हेगार संकेत सुनिल गायकवाड पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टरला मिळाली मंजूरी, झाले कन्फर्म ! ‘इतकी’ वाढेल सरकारी कर्मचार्‍यांची सॅलरी

 

Related Posts