IMPIMP

NCP-AIMIM | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं; एमआयएम-राष्ट्रवादीची युती होणार ?

by nagesh
NCP-AIMIM | aimim mp imtiaz jaleel meets ncp leader and health minister rajesh tope in aurangabad NCP AIMIM Alliance

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NCP-AIMIM | राज्याच्या राजकारणात मोठी उलाढाल होणार असल्याचं दिसत आहे. राजकारणामध्ये कोणी विचारही केला नव्हता की शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन करतील. अशाचप्रकारे आता आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एमआयएम (AIMIM) यांच्यात युतीच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. (NCP-AIMIM)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि औरंगाबादचे (Aurangabad) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यामध्ये भेट झाली होती. याबाबत इम्तियाज जलील यांनी माहिती दिली. आम्हाला प्रत्येकवेळी भाजपची बी टीम (BJP B Team) बोललं जातं. मग राष्ट्रवादीसोबत युती (Nationalist Congress Party AIMIM Alliance) करायला आम्ही तयार असल्याची ऑफर टोपेंना दिली असल्याचं जलील यांनी सांगितलं. (NCP-AIMIM)

 

एमआयएमला सोबत घेणं कोणालाच पसंत नाही मात्र मुस्लिम मते (Muslim Voters) सर्वांना पाहिजेत.
त्यामुळे जर काँग्रेसला (Congress) वाटत असेल युती करावी तर त्यांच्यासोबतही युती करायला आमची तयारी आहे.
आज देशात सर्वात जास्त नुकसान भाजप करत आहे.
त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही काय करावं लागेल ते करण्यासाठी तयार असल्याचं जलील म्हणाले.

 

दरम्यान, एमआयएमने राष्ट्रवादीला दिलेल्या युतीच्या ऑफरवर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- NCP-AIMIM | aimim mp imtiaz jaleel meets ncp leader and health minister rajesh tope in aurangabad NCP AIMIM Alliance

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya On Anil Parab | ‘चला दापोली, मंत्र्यांचं रिसॉर्ट तोडणार ?; किरीट सोमय्यांच्या ट्विटने खळबळ

Pune Crime | बिबवेवाडीत कोयत्याने सपासप वार करून तरूणाचा खून, युवकाला ‘खल्लास’ केल्यानंतर कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

Benefits Of Cloves | Liver, डायबिटीज, पोट, दात आणि Bones साठी जबरदस्त आहे ‘ही’ एक घरगुती गोष्ट, Sugar Level करते कंट्रोल

 

Related Posts