IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | ‘छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे असेल तर…’ – शरद पवार

by nagesh
Maharashtra Election | ncp suspended rebel candidate suspended rebel candidate satish itkelwar nagpur election

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – NCP Chief Sharad Pawar | राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत असून सत्ताधारी भाजपने याबाबत अजित पवारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. आज याबाबत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी एक विधान केले आहे. तसेच या विधानाबाबत लवकरच अजित पवार (Ajit Pawar) माध्यमांसमोर येतील असे सुतोवाच देखील दिले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आले असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचे असेल तर धर्मवीर म्हणा. ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा. मला काळजी अशी वाटते की, मी ठाण्याला जेव्हा जातो तो धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे पुढे येतात. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते. काही जाहीरातीमध्येही त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? एखाद्या व्यक्तिची आस्था असते त्यातून तो तसा काही उल्लेख करत असतो.’

 

‘छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर अनेक हल्ले होत असताना संभाजी महाराजांनी राज्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम केले. याची नोंद सर्वांनी घेतली पाहीजे. म्हणून त्यावर वाद घालण्याचे कारण नाही.’, असे म्हणत शरद पवार यांनी या वादावर पडदा टाकावा असे आवाहन केले.

 

तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर शरद पवारांना प्रश्न विचारला असता. त्यांचे वक्तव्य मी ऐकले वा पाहिले नाही.
त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही.
अजित पवारांचे वक्तव्य मी टीव्हीवर पाहिले होते म्हणून मी त्यावर प्रतिक्रिया देतो असेही शरद पवार म्हणाले.
त्याचप्रमाणे जर एखादा आमदार बोलत असेल तर त्या प्रत्येकावर मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही.
असे देखील शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawar comment ajit pawar dharmaveer sambhaji maharaj issue

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | नोटबंदी निर्णयावर संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात; म्हणाले…

MP Amol Kolhe | छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ की ‘धर्मवीर’?, खा. अमोल कोल्हेंनी स्पष्ट केली भूमिका (व्हिडीओ)

MP Vinayak Raut | ‘नारायण राणे हैवानाची औलाद, चुलत भावाचा खून केला, नार्को टेस्ट करा’, खा. विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप

 

Related Posts