IMPIMP

NCP MLA Amol Mikari On BJP Mohit Kamboj | रोहित पवारांवरील ट्विटनंतर अमोल मिटकरींची खोचक टीका; म्हणाले – ‘कंबोज नावाच्या भोंग्याला…’

by nagesh
Amol Mitkari | 'The rotten brain under the black hat of Bhagat Singh Koshyari' - Amol Mitkari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NCP MLA Amol Mikari On BJP Mohit Kamboj | कंपनीचा अभ्यास करण्यासाठी आधी स्वत:कडे तेवढा मेंदू असावा लागतो. मोहीत कंबोज कुणाच्या इशारावर चालतो आणि त्याच्यामागे कुणाचा मेंदू आहे, हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे कंबोज नावाच्या भोंग्याला फार महत्त्व द्यायची गरज नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (NCP MLA Amol Mikari On BJP Mohit Kamboj)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपा नेते मोहीत कंबोज यांनी, राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार, असे ट्विट करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना इशारा दिला होता. तसेच कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली होती. यानंतर राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी कंबोज यांना प्रत्युत्तर दिल्याने कंबोज यांनी आपला मोर्चा रोहित पवार यांच्याकडे वळवून नाव न घेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा गर्भित इशारा दिला आहे. बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा मी अभ्यास करतोय असे कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

 

कंबोज यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बारामती अ‍ॅग्रो कंपनीबाबत सविस्तर अभ्यास करणार आहे. या कंपनीच्या यशोगाथेबाबत मी स्वत: वैयक्तिक अभ्यास करायला सुरुवात केली आहे. लवकरच याचा एक सविस्तर अहवाल मी सादर करणार आहे. त्यामुळे युवकांना कंपनीची यशोगाथा समजून घेण्यास मदत होईल. या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोहीत कंबोज यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

मिटकरी यांनी म्हटले की, मोहीत कंबोज कोण आहे? अभ्यास करण्यासाठी त्याच्याकडे तेवढा मेंदू आहे
का. तो कुणाच्या इशार्‍यावर चालतो आणि त्याच्यामागे कुणाचा मेंदू आहे, हे आम्हाला माहीत आहे.
त्यामुळे मोहीत कंबोजला उत्तर देण्यासाठी रोहित पवार समर्थ आहेत.

 

मिटकरी यांनी पुढे म्हटले की, मोहीत कंबोजने आणखी सखोल अभ्यास करावा, हवे तर बारामतीला जावे, बारामतीचा झालेला विकास बघावा,
वेळ मिळाला तर तिथे नाक घासावे आणि थोडीफार अक्कल शिल्लक असेल तर त्याने आपल्या भागातही असा विकास करून दाखवावा.
रोहित पवारांविरोधातील कंबोज यांचे ट्विट म्हणजे महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी केलेला प्रयत्न आहे.
त्यामुळे कंबोज नाव्याच्या भोंग्याला जास्त महत्त्व देऊ नये, अशी खोचक टिका मिटकरी यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- ncp mla amol mikari on bjp leader mohit kamboj tweet about rohit pawar baramati agro

 

हे देखील वाचा :

Indian Marathi Film Corporation | जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि यशवंत गायकवाड यांच्याकडून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दोन एकर जागा दान

CM Eknath Shinde | ‘देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली’ – एकनाथ शिंदे

Navneet Rana | नवनीत राणांच्या खासदारकीमागे नेमके कुणाचे आशीर्वाद? शरद पवार की भाजपा नेते देवेंद्र फडणवीस?

 

Related Posts