IMPIMP

Navneet Rana | नवनीत राणांच्या खासदारकीमागे नेमके कुणाचे आशीर्वाद? शरद पवार की भाजपा नेते देवेंद्र फडणवीस?

by nagesh
Navneet Rana | whose blessing is behind mp navneet rana sharad pawar and devendra fadnavis

अमरावती :  सरकारसत्ता ऑनलाइन Navneet Rana | अमरावतीचे (Amravati) राणा दाम्पत्य (Rana Couple) सध्या भाजपा नेत्यांना खुश करण्यासाठी सोयीचे राजकारण करत असल्याचे सातत्याने दिसत आहे. राणा दाम्पत्याचे हे सोयीचे राजकारण पुन्हा एकदा उघड झाले आहे. चारच महिन्यापूर्वी नवनीत राणा (Navneet Rana) यांनी एका जाहीर कार्यक्रमात खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोमोर कबुल केले होते की, मी शरद पवारांच्या आशीर्वादामुळे खासदार झाले, अन्यथा होऊ शकले नसते. परंतु दहिहंडी कार्यक्रमात नवनीत राणा यांनी आपल्या खासदारकीचे श्रेय भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रविवारी दहिहंडीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक करताना खासदार नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत नसल्याने माझा पराभव झाला. देवेंद्र फडणवीस 2014 च्या निवडणुकीत सोबत असते तर मी त्यावेळी निवडून आले असते. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत नसले तरी त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत असल्याने लोकसभा निवडणुकीत मी विजयी झाले.

 

नवनीत राणा यांचे हे सोयीच्या राजकारण सध्या चर्चेचा विषय झाले आहे. एप्रिल महिन्यात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात नवनीत राणा म्हणाल्या होत्या की, पवार जे बोलतात, तेच महाराष्ट्रात होते. त्यांनी जे ठरवले, तसेच महाराष्ट्रात घडते. शरद पवार यांच्या आशीर्वादामुळेच मी खासदार झाले, अन्यथा झाले नसते.

 

2014 मध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ (Shivsena Anandrao Adsul) यांच्या विरोधात लढत दिली. त्यावेळी नवनीत राणा यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. नवनीत राणा या विजयी झाल्या, पण त्यांनी लगेच काँग्रेस, राष्ट्रवादीची (NCP) साथ सोडली.

 

नवनीत राणा या निवडणुकीनंतर आपली साथ देणार नाहीत, असा संशय निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केला होता.
एका प्रचार सभेत तर त्यांच्याकडून वचनही घेण्यात आले होते.
पण, निवडणूक निकालानंतर लगेच नवनीत राणा यांनी वेगळा रस्ता निवडल्याचे शल्य अजूनही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Navneet Rana | whose blessing is behind mp navneet rana sharad pawar and devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | नगराध्यक्ष, सरपंच निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Mohit Kamboj-Rohit Pawar | ट्विट करत मोहित कंबोज म्हणाले – ‘बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा…’

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार? मनसेच्या बैठकीत काय ठरलं? बाळा नांदगावकर म्हणाले…

 

Related Posts