IMPIMP

NCP MP Amol Kolhe Praised Ajit Pawar | अमोल कोल्हेंकडून अजित पवारांचे कौतुक; म्हणाले – ‘निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवारांचा हात लागतोच…’

by nagesh
NCP MP Amol Kolhe Praised Ajit Pawar | NCP MP amol kolhe praised ajit pawar in pimpri chinchwad after a statement about jayant patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – NCP MP Amol Kolhe Praised Ajit Pawar | पिंपरी- चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) दिशा सोशल फाउंडेशनतर्फे (Disha Foundation) शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे (Shirur LokSabha MP Amol Kolhe) यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. काहीच दिवसांपूर्वी खा. अमोल कोल्हे यांनी घेतलेली मनसे प्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) मुलाखत चांगलीच गाजली होती. त्यांच प्रमाणे अमोल कोल्हे यांची घेण्यात आलेली ही मुलाखतही गाजत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडतील, असे विधान करणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे मनापासून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंगळवारी पार पडलेल्या या मुलाखतीत अमोल कोल्हेंनी अनेक राजकीय (Politics) प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी आपल्या शिरूरमधील यशाचे श्रेय अजित पवार यांनाच दिले. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यामुळेच मी शिरूर लोकसभेचा खासदार झालो असल्याचा खुलासा यावेळी कोल्हेंनी केला.

 

मुलाखत रंगत असताना तुम्ही भाजपामध्ये जाणार का? या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी मिश्किलपणे दिले.

तुम्ही भाजपामध्ये (BJP) जाणार का? असा प्रश्न विचारताच खा. अमोल कोल्हेंनी प्रेक्षकांना प्रतिप्रश्न करत,
काय करू असे विचारले, मग मिश्किल उत्तर देत “मतदारांमध्ये एक वाक्यता नाही, मग कशाला घाई करायची”,
असे उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने प्रेक्षकांनी टाळ्यांचा गडगडाट केला.
त्यांचे हे उत्तर म्हणजे ते किती कुशल राजकारणी आहेत हे दाखवणारे आहे.

 

पुढे ते म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा मी खासदार आहे. यात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे.
एकीकडे त्यांचा मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) निवडणूक लढवत होता. शिरूर लोकसभा मी लढवत होतो.
असे असताना मावळ आणि शिरूर लोकसभा अजित पवार यांनी हाताळली, स्वतः जातीने लक्ष घातले.
अन्यथा २२ दिवसांत लोकसभेची निवडणूक चेहऱ्यावर जिंकता येत नाही. त्यासाठी अजित पवारांचा हात लागतो.
तर आणि तरच निवडणूक जिंकता येते, असे म्हणत कोल्हेंनी अजित पवारांचे (Ajit Pawar) तोंडभरून कौतुक केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  NCP MP Amol Kolhe Praised Ajit Pawar | NCP MP amol kolhe praised ajit pawar in pimpri chinchwad after a statement about jayant patil

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – मी टिपू पठाणचा नंबरकारी ! तरूणावर चाकूने वार

Nitesh Rane On Sanjay Raut | संजय राऊत सर्वात मोठा लँड माफिया, धमकी देऊन जमीन विकत घेतली; भाजप आमदार नितेश राणेंचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

Mumbai Metro Line 3 | मेट्रो-3 चा आरे ते बीकेसी स्थानकादरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार

 

Related Posts