IMPIMP

Mumbai Metro Line 3 | मेट्रो-3 चा आरे ते बीकेसी स्थानकादरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार

by nagesh
Mumbai Metro Line 3 | The first phase of Metro-3 between Aarey and BKC station will be completed by December 2023

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Mumbai Metro Line 3 | मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत मेट्रो ३ चा हा टप्पा (आरे ते बीकेसी स्थानक) पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. (Mumbai Metro Line 3)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशनद्वारे Mumbai Metro Rail Corporation Limited (MMRC) तयार करण्यात येत असलेल्या मेट्रो-३ च्या चर्चगेट ते विधानभवन या भुयारी स्थानकाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह (IPS Brijesh Singh), मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प ) सुबोध गुप्ता (Subodh Gupta MMRC) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Mumbai Metro Line 3)

 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भुयारी मार्गातून चालत प्रकल्पाची पाहणी केली आणि कामाची संपूर्ण माहिती घेतली. मुंबई मेट्रो मार्ग-३ (कुलाबा-वांद्रे- सीप्झ) हा मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाहतुकीच्या पर्यायी सुविधेसाठी हा मार्ग असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हवा, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

मेट्रो ३ मार्ग हा मेट्रो -१, २,६ आणि ९ यांना तसेच मोनोरेलला जोडला जाणार आहे. याशिवाय, उपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याशिवाय मुंबईतील विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे. या मेट्रो -3 रेल्वेमार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहने कमी होतील असा विश्वास व्यक्त करून या मार्गाचा पहिला टप्पा (आरे ते बीकेसी स्थानक) डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत तर दुसरा टप्पा जून २०२४ पूर्वी पूर्ण केला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

 

राज्याच्या विकासाचे जे प्रकल्प आहेत, त्यांना विलंब होणार नाही. आरेचा कारशेडचा विषय मार्गी लागला आहे. मेट्रो रेल्वेचे अधिकारी- कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करीत आहेत. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ प्रकल्प : एक दृष्टिक्षेप

– कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा ३३.५ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग आहे

– या मार्गावर २७ स्थानके असून त्यापैकी २६ भुयारी तर एक जमिनीवर आहे.

– या मार्गामुळे प्रमुख व्यवसाय आणि रोजगार केंद्रे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, मनोरंजनाच्या सुविधा तसेच उपनगरीय रेल्वेशी न जोडलेल्या काळबादेवी, गिरगाव, वरळी, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांसारख्या भागांना जोडणी मिळेल.

– २०२४ पर्यंत मेट्रो-३ च्या प्रत्येकी ८ डब्यांच्या ३१ गाड्या कार्यरत असतील.

– इतर मेट्रो मार्ग, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि एसटी बस सेवांशी एकत्रित जोडणी करत असून उपनगरीय रेल्वेतील १५% प्रवासी मेट्रो-३ कडे वळतील.

– सन २०४१ पर्यंत मेट्रो-३ मुळे वाहनांच्या फेऱ्यांमध्ये प्रतिदिन ६.६५ लाखाने घट होईल.

– या मार्गामुळे दरवर्षी २.६१ लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल.

 

 

पहिला टप्पा : आरे ते बीकेसी (Aarey To BKC)

एकूण स्थानके या मार्गावर १० स्थानके असून त्यापैकी ९ भुयारी तर एक जमिनीवर आहे.

अंतर १२.४४ किमी

दोन गाड्यांमधील कालावधी ६.५ मिनिटे

पहिल्या टप्प्यातील गाड्यांची संख्या ९ गाड्या

मेट्रो ३ मार्गाचे पहिल्या टप्प्यातील एकूण ८७.२% काम पूर्ण

एकूण ९७.८% प्रकल्प बांधकाम पूर्ण

(Total) एकूण ९३% स्थानक बांधकाम पूर्ण

एकूण ६५.१% प्रणालीची कामे पूर्ण

रेल्वे रुळाचे एकूण ८६.३% बांधकाम पूर्ण

सेवेची चाचणी ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दुसरा टप्पा : बीकेसी ते कफ परेड

एकूण स्थानके १७ .

अंतर २१.३५ कि.मी.

दोन गाड्यांमधील कालावधी ३.२ मिनिटे

दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांची संख्या २२ गाड्या

मेट्रो ३ मार्गाचे (दुसऱ्या टप्प्यातील) एकूण ७६.९% काम पूर्ण

एकूण ९५.३% प्रकल्प बांधकाम पूर्ण

(Total)  एकूण ८८.३% स्थानक बांधकाम पूर्ण

एकूण ४२.४% प्रणालीची कामे पूर्ण

रेल्वे रुळाचे एकूण ४६.६% बांधकाम पूर्ण

हा मार्ग अंदाजे जून २०२४ मध्ये सुरू होणार

मेट्रो ३ मार्गाचे एकूण ८१.५% काम पूर्ण

एकूण ९२.८% प्रकल्प बांधकाम पूर्ण

८९.८% स्थानकांचे बांधकाम पूर्ण

५०.९% प्रणालीची कामे पूर्ण

रेल्वे रुळाचे ६१.१% बांधकाम पूर्ण

भुयारी मार्गाचे १००% काम पूर्ण

४२ ब्रेकथ्रू संपन्न

डेपोचे ६३% बांधकाम पूर्ण

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सद्यस्थितीत डेपो ३१ गाड्यांच्या देखभालीसाठी सज्ज

आरे डेपोमध्ये वेगवेगळ्या कंत्राटदारांच्या समन्वयाने मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहेत. डेपोमध्ये देखभाल आणि कार्यशाळा इमारत कामे, ऑपरेशन कंट्रोल सेंटर,ओव्हरहेड इक्विपमेंट सिस्टम, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लंबिंगची.कामे, स्टॅबलिंग लाइन, ऑक्झिलरी सबस्टेशन, वॉश प्लांट, रेल्वे रुळ घालणे इत्यादी कामांचा समावेश आहे.

 

 

मेट्रो-३ च्या गाड्या

आतापर्यंत मेट्रो-३ च्या तीन गाड्या मुंबईत दाखल; अजून दोन गाड्या श्रीसीटी आंध्र प्रदेश येथील ऑस्तोम कारखान्यातून मुंबईकरिता रवाना झाल्या असून दि. १७ किंवा १८ मेपर्यंत या गाड्या मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे. यानंतर उर्वरित ४ गाड्या प्रत्येक महिन्यात २ अशा मुंबईत दाखल होतील.

मेट्रो मार्ग-३ चा दक्षिण मुंबईतील विस्तार, कफ परेड ते नेव्ही नगर

एकूण लांबी – २.५ किमी

स्थानकाची संख्या १ (नेव्ही नगर स्थानक)

स्थानकाचे ठिकाण- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च (टीआयएफआर) जवळील डॉ. होमी भाभा रोड

अंदाजे खर्च साधारण २४०० कोटी

या भागातील पुनर्विकासाचा विचार करता नेव्ही नगरमधील अंदाजे ५० हजार लोकांना या मेट्रो मार्गाचा फायदा होईल.

 

 

Web Title :- Mumbai Metro Line 3 | The first phase of Metro-3 between Aarey and BKC station will be completed by December 2023

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Pune PMC Property Tax News | आता मिळकत कर थकबाकीदारांकडे महापालिकेचा मोर्चा ! मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती सील करणार, चेंज ऑफ युज केलेल्यांची व्यावसायीकांची आकारणी करणार

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : फरासखाना पोलिस स्टेशन – बुधवार पेठेत गंमत म्हणून आले अन् तिघांनी त्यांना मारहाण करून लुटले

 

Related Posts