IMPIMP

Nia Sharma | ‘सात समंदर पार’ या गाण्यावर निया शर्मानं केला बोल्ड डान्स, व्हिडिओनं सोशल मीडियावर लावली ‘आग’

by nagesh
Nia Sharma | nia sharma killer dance moves on saat samundar paar sets netizens on fire

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Nia Sharma | सोशल मीडियावर निया शर्मा आपल्या बोल्ड आणि हॉट (Hot-Bold) अंदाजनं चाहत्यांना घायाळ करत असते. ती (Nia Sharma) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. नुकतंच एका कारणामुळे निया चांगलीच चर्चेत आली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

निया शर्माचा एक म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये 90s ‘सात समुंदर पार’ (Sat Samundar Paar) रिक्रिएटेड वर्जन वर तिनं डान्स केला आहे. दरम्यान, हे गाणं सनी देओल (Sunny Deol) आणि दिव्या भारती (Divya Bharti) यांच्या ‘विश्वात्मा’ या 1992 मधील चित्रपटातील आहे. सात समुंदर पार हे गाणं एकेकाळी जोरदार हिट झालं होतं. तर या गाण्याचे एक रिक्रिएटेड वर्जनपण आहे. त्यानं सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे.

 

 

https://www.instagram.com/p/CXX_YihI4r4/?utm_source=ig_web_copy_link

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मानं (Nia Sharma) सात समुंदर पार याच्या रिक्रिएटेड वर्जनमध्ये डान्स करून इंटरनेटवर चांगलीच आग लावली आहे. तिनं हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून, यामध्ये तिचे एक्स्प्रेशन अगदीच हॉट दिसत आहे. व्हिडिओमध्ये पांढरा कलरचा क्रॉप टॉप आणि मॅचींग थाई हाई ड्रेस घातला आहे. ती पावसामध्ये डान्स करत आहे. तर हे गाणं 14डिसेंबर रोजी रिलीज झाला असून, गाण्यानं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तसेच नियाचा डान्सनं चाहत्यांना चांगलंच घायाळ केलंय.

 

 

दरम्यान, या गाण्याचे दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर मुदस्सर खान आहे. या व्हिडिओवर चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनी देखील कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच रूबीनानं ‘हॉट’ असं म्हणत कमेंट केली आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स पाऊस पडला आहे.

 

 

Web Title: Nia Sharma | nia sharma killer dance moves on saat samundar paar sets netizens on fire

 

हे देखील वाचा :

MPSC | न्यायालयाच्या सुनावणीचे कारण देत पुन्हा 416 उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब

HM Amit Shah Pune Visit | गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत ! महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Small Saving Schemes | ‘या’ सरकारी योजनांकडून लोकांची अपेक्षा भंग, पोस्ट ऑफिसमध्ये पण डिपॉजिट घटले

 

Related Posts