IMPIMP

Nikhil Wagle On Pune Police | कालचा हल्ला पुणे पोलिसांच्या संगनमताने, पत्रकार निखिल वागळे यांचा गंभीर आरोप

by sachinsitapure
Nikhil Wagle

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Nikhil Wagle On Pune Police | काल पुण्यातील दांडेकर पुल भागातील राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात पत्रकार निखिल वागळे यांची निर्भय बनो सभा (Nirbhay Bano Sabha) होणार होती. या सभेला ते अ‍ॅड. असिम सरोदे (Ad Asim Sarode) यांच्यासह कारमधून येत असताना भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. मात्र, त्यानंतरही पत्रकार निखिल वागळे यांनी ठरल्याप्रमाणे सभा घेतली. या घटनेनंतर महाराष्ट्रात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, कालच्या हल्ल्याबाबत पत्रकार निखिल वागळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून यामध्ये पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता, तसेच तो पोलिसांशी संगनमताने करण्यात आल्याचे वागळे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. निखिल वागळे यांनी फेसबुकवरील आजच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो, काल मृत्यू दारात दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो.

मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..काँग्रेसचे अरविंद शिंदे, वंचित आणि आपचे कार्यकर्ते, धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे.

आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला.
अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला. काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशिर्वादाने ही माझी श्रद्धा आहे.

आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो. तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात.. आभार कसे मानू? जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही.
संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच, असे वागळे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Posts