IMPIMP

Pune Police News | पुणे : अवैध हातभट्टीवर गुन्हे शाखा व लोणी काळभोर पोलिसांचा छापा, 36 लाखांचे रसायन नष्ट (Video)

by sachinsitapure
Loni Kalbhor Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police News | अवैध धंद्याविरोधात पुणे पोलिसांनी कारवाई सुरु केली असून, शुक्रवारी (दि.9) सकाळी गुन्हे शाखेच्या युनिट 5 व 6, सामाजिक सुरक्षा विभाग (SS Cell Pune) व लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) संयुक्त कारवाई करुन हातभट्टीसाठी लागणारे 36 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 91 हजार लिटर रसायन नष्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी हातभट्टी मालक मालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime Branch)

हातभट्टी मालक शंकर तानाजी धायगुडे, शेखर मधुकर काळभोर, राहुल दामोदर बनसोडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अधिनियम 65 फ, आयपीसी 328, 34 नुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. (Pune Police News)

सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी पहाटे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी लोणी येथील रामदरा कॅनल रोड लगत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारु तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 5, युनिट 6, सामाजिक सुरक्षा विभाग व लोणी काळभोर पोलिसांच्या पथकाने सकाळी सातच्या सुमारास याठिकाणी छापा टाकला. याठिकाणी सात मोठ्या लोखंडी टाक्यांमध्ये 36 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 91 हजार लिटर रसायन आढळून आले. पोलिसांनी हातभट्टीसाठी लागणारे रसायन पोकलेन यंत्राच्या साह्याने जागीच नष्ट करुन तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त प्रविण पवार, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त
शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक
शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेतील युनिट-5 आणि युनिट-6 चे पोलिस निरीक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली आहे.

Related Posts