IMPIMP

Nitin Gadkari | नितीन गडकरी यांच्या साधेपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या नेमकं काय झालं?

by nagesh
Nitin Gadkari | nitin gadkari stands queue common passenger board indigo flight video goes viral

सरकारसत्ता ऑनलाइन  – Nitin Gadkari | संपूर्ण देशात रस्त्याचं जाळ निर्माण करणारे तसेच कोणाचीही भीडभाड न बाळगता मनात येईल आणि जे पटेल ते बोलणारे केंद्रातील भारदस्त नेतृत्त्व म्हणजे नितीन गडकरी (Nitin Gadkari). केंद्रीय मंत्री म्हंटल्यावर ते सामान्यांना थांबवून विमानात जाऊ शकतात. परंतु, त्यांनी तसे केले नाही. विमानात जाण्यासाठी त्यांनी सामान्यांच्या रांगेत उभे राहणे पसंत केले. त्यांच्यातील या साधेपणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हारल होत आहे. नवनीत मिश्रा नावाच्या युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

गो इंडिगो (Go Indigo) ही कमी दरात, सामान्य प्रवाशांसाठी विमानसेवा देणारी कंपनी. मध्यम वर्गीय, कंपन्यांचे कर्मचारी आदींना अन्य विमान कंपन्यांपेक्षा कमी दरात सेवा पुरविते. याच विमानातून गडकरी यांना प्रवास करायचा होता. अन्य प्रवाशांप्रमाणे ते बसने विमानात बसण्यासाठी तेथे पोहोचले. मंत्री म्हंटल्यावर त्यांना प्रथम प्राधान्य द्यायला हवे होते. अन्य मंत्री तसे करतात. उशिरा येतात. मंत्री येई प्रयत्न विमाने तासंतास थांबल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गडकरींनी (Nitin Gadkari) मात्र अन्य प्रवाशांसोबत रांगेत उभे राहणेच पसंत केले. विमानात एकामागोमाग प्रवाशी जात होते. तसे गडकरीही (Nitin Gadkari) पुढे जात होते. हा एकूण घटना क्रम व्हिडिओमध्ये कैद करत नवनीत मिश्रा नामक युजरने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याच्यानुसार गडकरी विमानात जाण्यासाठी रांगेत वाट पाहत होते. आतापर्यंत हा व्हिडीओ ११.३ लाईक आणि १९००हुन अधिक वेळा शेअर केला गेला आहे.

Web Title : Nitin Gadkari | nitin gadkari stands queue common passenger board indigo flight video goes viral

हे देखील वाचा :

Pune Crime | दोन मुलीचं झाल्याने विवाहितेचा छळ; सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

Solapur Crime | बार्शीत 21 वर्षीय युवकाने झोपलेल्या आईची डोक्यात दगड घालून केली हत्या

Corporator Archana Patil | रुग्णालयांकडून दरपत्रक दर्शनी भागात लावण्यास उदासीनता, नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली ‘ही’ मागणी

Sameer Wankhede Spying Case | समीर वानखेडे हेरगिरी प्रकरण ! मुंबई पोलीस आयुक्तांनी उचललं ‘हे’ पाऊल

Related Posts